प्रतिष्ठा न्यूज

भारताची एकता व अखंडता जपण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान महत्त्वाचे : प्रा.डॉ.त्रिशला कदम; श्रीमती आ.रा. पाटील कन्या महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज
इचलकरंजी : येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली. सरदार वल्लभाई पटेल यांचा ३१ आक्टोबर हा जन्मदिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण भारताच्या एकसंघीकरणांमध्ये त्यांनी खूप मोठे योगदान दिले होते.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा आढावा घेतला.त्या म्हणाल्या की, सरदार वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती स्थापने करीताही त्यांनी कार्य केले. हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते. भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएसच्या सर्व विद्यार्थिनींनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यामध्ये राष्ट्रीय एकता शपथ आणि राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन ही करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.धीरज शिंदे आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ विठ्ठल नाईक, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख श्री अनिल कुंभार,सौ.एकता जाधव, सौ. सोनाली बोरगांवकर-देशपांडे, सौ.मनिषा गवळी, डॉ सविता भोसले, डॉ प्रियंका कुंभार, डॉ राजश्री मालेकर, सौ.शितल आंबी तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते,प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.