प्रतिष्ठा न्यूज

महात्मा फुले यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : थोर समाजसुधारक, महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी, प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांनी केले. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी आयटीआय कॉर्नर येथील महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल उपस्थित विद्यार्थी ,विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले .
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री राऊत म्हणाले की, महात्मा फुले यांचे कार्य आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य विद्यार्थी युवकांसाठी प्रेरणा देणारे आहे , आपण आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जयंती उत्सव साजरा केला पाहिजे. महात्मा फुले यांनी स्वत: च्या घरावर तुळशीपत्र ठेवून बहुजन समाजासाठी शिक्षण दिले. यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यावेळी शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ तेजस माळवदकर यांनीही मार्गदर्शन केले .
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे,समाज कल्याण अधिकारी बापू दासरी,समाजकल्याण निरीक्षक दत्ताहरी कदम,खानसोळे आदिजण उपस्थिती होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज स्मारकापासून विजय नगर, महात्मा फुले मार्केट, शिवाजी नगर मार्गे आयटीआय कार्नर पर्यंत रॅली काढण्यात आली .यावेळी रॅली मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कि जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.
महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या रॅलीमध्ये यावेळी शहरातील शाळा महाविद्यालय शिक्षक विद्यार्थी विद्यार्थीनी हजारो च्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.