प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समिती निकृष्ट बांधकाम प्रकरणी डिडिआर कडून ठेकेदारांना नोटीस : बांधकाम तपासणी फी भरा अन्यथा कारवाई…मनसेकडून पाठपुरावा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे विस्तारीत बेदाणा मार्केट मधील बांधकामाची तपासणी फी तात्काळ भरा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा डी डी आर यांनी दिला आहे.यासंबंधी श्री. कुबेरा कन्स्ट्रक्शन प्रा.लि. सांगली,व मे. आर्क प्रमोद चौगुले,मे.चौगुले पाटील कन्स्लंटंटस प्रा.लि. सांगली यांना नोटीसा काढण्यात आल्याची माहिती मनसे नेते अमोल काळे यांनी दिली. तासगाव कृषी उत्पप्न बाजार समितीने निकृष्ट काम केल्याचा आरोप करत मनसेने याचा पाठपुरावा केला आहे.
दिलेल्या नोटीशित जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सांगितले आहे की अशोक भिलवडे,कन्स्लेटींग इंजिनियर सांगली यांनी तासगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे विस्तारीत बेदाणा मार्केट मधील बांधकामाची तपासणी करून अहवाल बाजार समितीकडे सादर केलेला होता.
तथापी त्यांनी केलेला तपासणी अहवाल आपणास मान्य नसलेचे कारणाने आपणं संदर्भिय पत्र क्रमांक ५ नुसार विभागाकडून तपासणी करून घ्यावी असे कळविले होते. सदर बांधकामाची तपासणी करणेस कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम (पश्चिम) विभाग सांगली, महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे, मा. अधिक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पुणे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सांगली यांनी करणेस लेखी पत्राव्दारे असमर्थता दर्शविली आहे.
आता बाजार समितीने विजयकुमार गणपतराव पाटील प्रो.पा.गणपती कन्स्लटन्सी सांगली यांचेकडून दुबार तपासणी करून घेणेचे ठरविले आहे. सदर तपासणीची फी एकूण झालेल्या कामाच्या ०.९० टक्के त्यांनी मागणी केली आहे.तसेच खर्चापोटी आगाऊ रक्कम रु.२.५० लाख जमा करणेस संदर्भिय पत्र क्रमांक ५ अन्वये कळविले आहे.
तरी बांधकाम तपासणी पोटी लागणारी रक्कम आपण बाजार समितीचे सचिव यांचेकडून माहिती करून घेऊन कृषि उत्पन्न बाजार समिती तासगांव यांचेकडे जमा करावी.सदर कालावधीत आपण रक्कम जमा न केलेस  अशोक भिलवडे, कन्सलटींग इंजिनियर यांनी बाजार समितीकडे सादर केलेला बांधकाम अहवाल आपणास मान्य आहे असे ग्राहय धरणेत येऊन त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी,असा इशारा जिल्हा उपनिबंधक यांनी दिला आहे.मनसे नेते अमोल काळे यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.