प्रतिष्ठा न्यूज

थकीत घरपट्टी पाणपट्टी वसुलीसाठी सांगली महापालिका पुन्हा ॲक्शन मोडवर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : थकीत घरपट्टी पाणपट्टी वसुलीसाठी महापालिका पुन्हा एक्षण मोडवर आली असून वसुलीसाठी आता कडक कारवाई महापालिके कडून केली जाणार आहे.
घरपट्टी पाणीपट्टी वसुली वरून आयुक्त सुनील पवार यांनी वसुली कर्मचाऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे. 31 मार्च पूर्वी 80 टक्के वसुली न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याबरोबर पगार थांबवण्याचे आदेशही आयुक्त सुनील पवार यांनी आजच्या बैठकीत दिले. या बैठकीस उपायुक्त राहुल रोकडे , कर निर्धारक व संकलक नितीन काका शिंदे यांच्यासह पाणीपुरवठा आणि घरपट्टी विभागाचे अधिकारी वॉरंट ऑफिसर आणि वसुली कर्मचारी उपस्थित होते.
आज आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी महापालिका मुख्यालयात घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागाच्या थकबाकीचा आढावा घेतला. यावेळी घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागाची वसुली ही समाधानकारक नसल्याने आयुक्त सुनील पवार यांनी वसुलीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच या पुढच्या काळात कर्मचाऱ्यांनी वसुलीवर लक्ष ठेवावं आणि 31 मार्चपूर्वी 80 टक्के वसुली कर्मचाऱ्यांनी पूर्ण करावी अशा सक्त सूचनाही दिल्या. याचबरोबर जे कर्मचारी वसुलीमध्ये कमी पडतील किंवा वसुलीबाबत समाधानकारक कामगिरी नसेल अशा कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याबरोबर त्यांची वेतनवाढसुद्धा रोखण्याचे आदेश आयुक्त सुनील पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. याचबरोबर 31 मार्चपर्यंत घरपट्टी पाणीपट्टी विभागाच्या वसुली कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून घरपट्टी पाणीपट्टी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी सुद्धा वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जे मालमत्ता धारक वसुलीला प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्या मालमत्ता सील करण्याचे आदेश ही आयुक्त सुनील पवार यांनी दिले आहेत. ज्या इमारतीवर किंवा मालमत्तेवर मोबाईल टावर आहेत आणि मोबाईल टावरची थकबाकी असेल तर या थकबाकीसाठी संबंधित मालमत्ता धारकावर किंवा इमारत मालकावर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पवार आणि उपायुक्त रोकडे यांनी दिले आहेत.
31 मार्चपूर्वी घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागाने 80 टक्के पर्यंत आपली वसुली करावी अन्यथा कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे. याचबरोबर जे मालमत्ताधारक किंवा कनेक्शनधारक आपली थकबाकी भरणार नाहीत त्यांच्या मालमत्ता सील करण्याबरोबर पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत. त्यामूळे आता थकीत घरपट्टी पाणपट्टी वसुलीसाठी महापालिका पुन्हा एक्षण मोडवर आली असून वसुलीसाठी आता कडक कारवाई महापालिकेकडून केली जाणार आहे.

वेळेत थकबाकी भरा शास्तीमध्ये सवलत मिळवा : उपायुक्त राहुल रोकडे यांचे आवाहन

ज्या मालमत्ता धारकांची थकबाकी आहे त्यांनी तातडीने भरल्यास त्यांना अभय योजनेंतर्गत शस्तिमध्ये 75 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे वेळेत थकबाकी भरून शास्तिमध्ये सवलत मिळावा आणि आपल्यावरील कारवाई टाळावी असे आवाहन उपआयुक्त राहुल रोकडे यानी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.