प्रतिष्ठा न्यूज

प्रा. संदीप पानारी यांचा एज्युकेशन अचीवमेंट अवॉर्ड्स २०२४ मध्ये यंग अचीवर अवॉर्डने सन्मान

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : प्रा. संदीप पानारी यांना द एज्युकेशन ओव्हर व्ह्यू व फाउंडेशन फॉर एज्युकेशन अँड कम्युनिटी वेल्फेअर पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ब्राईट हॅवक इन्फोटेक सोल्युशन्स यांच्यामार्फत ऑनलाईन आयोजित कार्यक्रमांमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या ते आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पद्मश्री डॉ ग गो जाधव महाविद्यालय मध्ये उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
प्रा. संदीप पानारी गेली अठरा वर्षे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असताना त्यांची कॉमर्स व्यवस्थापनातील अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत, त्यांचे २५ पेक्षा अधिक शोध निबंध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. त्यांना संस्थाध्यक्ष प्रा. सतीश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई व प्राचार्य डॉ. टी एम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांच्या कार्यात त्यांचे आई वडील व कुटुंबीयांची मोलाची साथ मिळली आहे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.