प्रतिष्ठा न्यूज

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त कुंडलमध्ये “सायक्लोथॉन” स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आज क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त कुंडलमध्ये “सायक्लोथॉन” स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत जिल्ह्यातून तब्बल ९५० स्पर्धकांनी भाग घेतला होता.यावेळी आमदार अरुण लाड,जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड,जिल्हा परिषद सदस्य शरद लाड,सुरेंद्र वाळवेकर,नितीन नवले,रणजित लाड, विक्रांत लाड,उप विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
या सायकल स्पर्धेत ११ वर्षाखालील गटातून प्रथम राजवर्धन शिंदे (प्रथम,विटा),आदर्श माळी (द्वितीय,कुंडल),साहिल सूर्यवंशी (तृतीय,पलूस) तर मुलींमध्ये साक्षी जाधव (प्रथम,कुंडल),आराध्या पाटील (द्वितीय,बांबवडे),शिफा मुल्ला (तृतीय,बांबवडे) यांनी क्रमांक मिळवला.
१४ वर्षाखाली,राजदीप मोरे (प्रथम,सांगली),यश देवकुळे (द्वितीय, ब्रम्हानंद नगर),अथर्व निकम (तृतीय,पलूस)तर महिलांमध्ये प्राजक्ता सूर्यवंशी (प्रथम,विटा),राजनंदिनी शिंदे (द्वितीय,विटा),प्रगती माळी(तृतीय,कुंडल)यांनी क्रमांक पटकावला.
१८ वर्षाखाली,निहान नदाफ (प्रथम,सांगली),वरद शिंदे (द्वितीय,सांगली),सुहास सूर्यवंशी (तृतीय,पलूस)यांनी तर महिलांमध्ये साक्षी पाटील (प्रथम,सांगली),साक्षी दोषी (द्वितीय,सांगली),पूर्वा माने (तृतीय सांगली) यांनी क्रमांक मिळवला.
खुल्या वर्गातून राम जाधव (प्रथम,सांगलीवडी), रमेश मंडले (द्वितीय,कुडनूर), साजिद सय्यद (तृतीय,सांगली) यांनी तर प्रोफेशनल वर्गातून शोएब मुलानी (प्रथम,पळशी), किरण बंडगर (द्वितीय,सांगली), दत्तात्रय चौगुले (तृतीय,बागेवाडी) यांनी क्रमांक पटकावला.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलम जाधव,संगीता माने,कैलास कोडग,भिलवडी सरपंच श्रेणीक पाटील,कार्यकारी संचालक सी एस गव्हाणे,गुत्तांना बाबर,आयर्ण मॅन डॉ.ऍड.गणेश चौगुले,अंतरराष्ट्रीय कबड्डी पट्टू महेश भिलवडे,हॅण्डबॉल खेळाडू प्रणव भागवत,राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवरंजनी पाटील यांचेसह परिसरातून हजारो खेळाडू उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन राहुल गायकवाड, शशिकांत साबळे, राहुल जगताप यांचेसह परीसरातील क्रीडा शिक्षकांनी व जी डी बापू लाड जन्मशताब्दी समितीने केले होते.
यावेळी मिरजेतील अशोक पाटील या ७५ वर्षीय आणि भिलवडी स्टेशन येथील ८५ वर्षीय भीमराव सूर्यवंशी या दोघांनी ४२ किलोमीटर सायकल चालवून स्पर्धकांत उत्साह निर्माण केला म्हणून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.