प्रतिष्ठा न्यूज

मराठीत सांगितलेलं कळत नाय; कन्नडमध्ये सांगू..? मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त तुरची ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार चौकशी प्रकरणी शिवसेनेचे हटके आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : तासगाव तालुक्यातील तुरची ग्रामपंचायत मध्ये ऑनलाइन आणि ऑफलाईन खरेदीमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, अशी रीतसर तक्रार शिवसेनेचे शाखा प्रमुख नारायण पोतदार यांनी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी मागणी देखील केली होती.
त्याच बरोबर ग्रामस्थांनी देखील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या अरेरावी, मनमानी कारभाराबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार अर्ज दिलेले आहेत. ग्रामपंचायत मध्ये सर्व अनागोंदी कारभार सुरू असून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी. अशी विनंती देखील केली. मात्र ढिम्म प्रशासनाने कसलीही कारवाईची तसदी घेतली नाही.
….. आणि म्हणूनच या निष्क्रिय प्रशासनास जाग यावी म्हणून;
*मराठीत सांगितलेलं कळत नाही, कन्नड मध्ये सांगू..?* असे म्हणत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चक्क कन्नड मध्ये निवेदन देण्यात आले.
यावेळी कन्नड मधून निषेध आणि  कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना सांगली जिल्हा माजी अध्यक्षा सौ. सुजाता ताई इंगळे, शिवसेना सांगली जिल्हा माजी अध्यक्षा सौ. अश्विनी ताई मोकळे,जिल्हा सदस्य, वंचित बहुजन आघाडीचे श्रीकांत ढाले, तासगाव तालुका शिवसेना माजी अध्यक्षा सौ. लक्ष्मी ताई पोतदार, शिवसेना तासगाव शहर उपप्रमुख सौ. वंदना ताई लेंगरे, तासगाव शहर उपप्रमुख सौ. वर्षा ताई सर्जे, सौ.तम्मना सतारमेकर, शाखा प्रमुख नारायण पोतदार, कुडंलीक पाटील, सतीश पाटील, धर्मराज कदम, सुरेश जाधव, रवी कदम यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.