प्रतिष्ठा न्यूज

सांगली महानगरपालिका शाळांच्या क्रीडा महोत्सवास प्रारंभ.. पहिल्याच दिवशी क.. कबड्डीचा..खो..खो.. आवाज घुमला

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर महानगरपालिकेच्या ५१ शाळांच्या शहर पातळीवरील तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मा.उपायुक्त स्मृती पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
चालू शैक्षणिक वर्षात आयुक्त सुनील पवार यांचे प्रेरणेतून नुकतेच मिरज आणि सांगली विभाग पातळीवर २००० विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन विजयी संघामधील ७०० खेळाडू शहर पातळीसाठी पात्र झाले आहेत. कबड्डी, खो-खो, रिले, धावणे, बेडूक उडी आदी खेळांचा समावेश आहे. दोन दिवस विद्यार्थी सामने, तिसऱ्या दिवशी शिक्षकांचे क्रीडा सामने आणि बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. महानगरपालिका शाळा क्रमांक ३६ सांगलीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त झांज पथक वादनाने पाहुण्यांचे स्वागत करून महोत्सवाचा विशेष माहोल तयार करण्यात आला. शाळा क्रमांक १८ मिरज मधील विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत आणून छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अतिथी सायकल पटू शहीद अहमद शब्बीर जमादार, बापू समलेवाले, क्रीडा अधिकारी अमजद जेलर यांचे खास उपस्थितीत प्रारंभ झाला.
याप्रसंगी बोलताना उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या की महानगरपालिका शाळा मधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रीडा महोत्सवातून खेळाडूंनी प्रेरणा घेऊन क्रीडा पुरस्कार पर्यंत झेप घ्यावी असे आवाहन केले. प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे, लेखापाल गजानन बुचडे, क्रीडा शहर प्रमुख शहाजहान तांबोळी, उपप्रमुख संतोष यादव, उपप्रमुख दिपाली माळवदे, महादेव पाटील, चित्रा शिंगाडे, अविनाश मस्के, अरुण कदम, जकी पटेल, संभाजी जोशी, संभाजी पाटील, संतोष पाटील, मारुती माळी, आयुब पटेल, किस्मत पटेल, जक्की पटेल, अकबर घोडीमार, कुंडलिक वनखडे, शंकर ढेरे, गजानन मोरलवार, चंद्रशेखर राऊत, गुरांन्ना बगले, शरद भाटे, सचिन भोसले, सुरेश जाधव, गोटू सूर्यवंशी, रेवप्पा खोत, अर्चना काटकर, रेश्मा ढेरे, धनश्री यादव, माधुरी चव्हाण, अशोक नागरगोजे, भीमराव शिंदे, ज्ञानेश्वर साबळे, रेश्मा कोकणे, सलीम शेख, सलीम चौगुले, विक्रम ठाकरे, अरुण निळे, असद पटेल केंद्र समन्वयक रवी शिंदे, विजय खोत, राहुल होनमोरे, पद्मा घोलप,नसीमा पठाण, पुजाराणी जाधव, कार्यालयीन कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व बालवाडी शिक्षिका यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर हजारे तर आभार संतोष यादव यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.