प्रतिष्ठा न्यूज

अंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी प्रियंका कदम व नम्रता ओमासे यांची विद्यापीठ कबड्डी संघामध्ये निवड

प्रतिष्ठान न्यूज / योगेश रोकडे 
सांगली : राजश्री छत्रपती शाहू कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली येथील खेळाडूंची रत्नागिरी येथे होणाऱ्या २५ व्या अंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संघामध्ये प्रियंका कदम व नम्रता ओमासे यांची निवड झाली. त्याबद्दल  डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली विभागीय अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे, प्रभारी प्राचार्य डॉ.अर्चना शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर प्रा. राजकुमार पाटील,डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली विभागीय सदस्य रवींद्र ब्रम्हनाळकर यांनी अभिनंदन केले. तर या यशस्वी विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक  किशोर चंदुरे, शिवशक्ती व्यायाम मंडळाचे घारगे सर  व निलेश सर यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.