प्रतिष्ठा न्यूज

तासगाव कवठेमहांकाळ मधील ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षा पुस्तक संच वाटप… आमदार सुमनताई पाटील यांचा स्थानिक विकास निधी..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेल यांच्या वतीने आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून तासगाव व कवठेमंकाळ तालुक्यातील ग्रंथालयांना देण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा पुस्तक संचाचे वाटप राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,समन्वयक रीता बाविस्कर मॅडम उपस्थित होते.
तासगाव तालुक्यातील आर आर पाटील ग्रंथालय तासगाव,कै.डी एन सूर्यवंशी (गुरुजी) सार्वजनिक वाचनालय,आर आर पाटील सार्वजनिक वाचनालय अंजनी,श्री सिद्धेश्वर मोफत वाचनालय विजयनगर,श्री.गंगल महाल सार्वजनिक वाचनालय घाटनांद्रे ता कवठेमंकाळ,मनेराजुरी सार्वजनिक वाचनालय मनेराजुरी,कुमठे सार्वजनिक वाचनालय कुमठे या ग्रंथालयांना हे पुस्तक संच वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना रोहित पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये टिकला पाहिजे शहरात मिळणाऱ्या अभ्यासाच्या सुविधा त्याला ग्रामीण भागात ही मिळाल्या पाहिजेत या हेतूने आमदार सुमनताई पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेले संदर्भ ग्रंथ प्रश्नसंच अशा प्रकारचे साहित्य ग्रंथालयांना देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.दरवर्षी अशा प्रकारे ग्रंथालयांना निधी देऊन ग्रंथालय समृद्ध केली जातील असा मानस त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विश्वास तात्या पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ॲड गजानन खुजट, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय हावळे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजीत पाटील,माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष सौ नलिनी पवार , राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या तालुका अध्यक्ष सौ सोनाली पाटील, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, ऍड तुकाराम कुंभार,ऍड निलेश कुंभार,स्वप्निल जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस युवक राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी चे सर्व पदाधिकारी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.