प्रतिष्ठा न्यूज

सौ. विशाखा राहुल थोरात यांना यशवंतराव चव्हाण सेंटर ची ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई च्या वतीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन २०२३’ ही शैक्षणिक फेलोशीप सौ. विशाखा राहुल थोरात यांना जाहीर झाली आहे. या शैक्षणिक फेलोशीप ची घोषणा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सौ. थोरात या यशवंतराव हायस्कूल देवराष्ट्रे येथे विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सौ. थोरात या फेलोशिप अंतर्गत ” खेळांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांमधील शब्द संपत्ती वाढविणे आणि मूलभूत गणितीय क्रियांचे ज्ञान वृध्दिंगत करणे ‘ या वर संशोधन करणार आहेत.

महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि मूलभूत संशोधन व्हावे, याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व्हावा या प्रमुख उद्देशाने, जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटरने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशीप’ ची सुरुवात मागील वर्षापासून केली आहे. शैक्षणिक फेलोशीप साठी एमकेसीएल फाऊंडेशन आणि मा.विवेक सावंत हे सहकार्य करत आहेत. एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४ साला साठी असणाऱ्या या संशोधन प्रकल्पा साठी रु ६०,०००/- अर्थसहाय्य मंजूर झाले आहे.

रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई येथील एका विशेष कार्यक्रमात ही फेलोशीप सौ. विशाखा थोरात यांना सन्मानपूर्वक प्रदान केली जाईल.

सौ. विशाखा थोरात यांना ही फेलोशीप मिळाले बद्दल यशवंत एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन मोहनभाऊ मोरे, सचिव संजय मोरे, मुख्याध्यापक के. एच. पवार, पर्यवेक्षक पी. टी. मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.