प्रतिष्ठा न्यूज

तासगावात उद्या विश्वकर्मा जयंती निमित्त रक्तदान शिबीरासह,विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : श्री.विश्वकर्मा पांचाळ समाज सेवाभावी संस्था तासगांव यांच्या वतीने उद्या प्रभु विश्वकर्मा यांचा प्रकटदिन सोहळा व रक्तदान शिबीराचे आयोजन माळी गल्ली तासगांव येथे करण्यात आले आहे.जयंती  सोहळ्यानिमित्ताने ध्वजारोहन,दिप प्रज्वलन,प्रतिमापुजन,श्री विश्वकर्मा व कालिका माता यांची माहीती प्रवचन,भजन,हळदी कुंकू असे धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे हि आयोजन करण्यात आले आहे.पद्‌मभुषण डॉ.वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय रक्तपेढी सांगली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे होणार आहे.तरी सर्व समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विश्वकर्मा पांचाळ समाज सेवाभावी संस्था,कालिकादेवी बहुउद्देशिय महिला मंडळ,  कालिकादेवी स्वयंस‌हायता महिला बचत गट यांच्यावतीने करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.