प्रतिष्ठा न्यूज

समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मिलींद सुतार यांचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगांव : येथील लक्ष्मी नारायण नागरी सह.पत संस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा विष्णू मंदिरात संपन्न झाली.यावेळी मिलींद सुतार यांना झिंदाबाद समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सुतार बालपणापासून संघाचे स्वयंसेवक असून संघाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.त्यांनी संघ परिवारातील विश्व हिंदू परिषद,बजरंग दल,सामाजिक समरसता मंच,राष्ट्रीय संघटन मंडळ,सहकार भारती, अखिल भारतीय ग्राहक पंचायत,धर्म जागरण समिती,स्वावलंबी भारत अभियान अशा विविध संघटनांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.याशिवाय माहिती अधिकार प्रबोधन समिती,विवेकानंद युवक मंच, पांचाळ समाज संस्था,इंजिनियर्स असोसिएशन अशा विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे.मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर त्यांनी तीन वर्षे अशासकीय सदस्य म्हणून प्रभावी काम केले आहे.तसेच सांगली येथील ग्राहक तक्रार निवारण आयोग (ग्राहक न्यायालय) मध्ये शासन नियुक्त मध्यस्त म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.लेखन,वाचन आणि प्रबोधन अशा तिन्ही अंगांनी त्यांचे काम चालू असते.ग्राहक प्रबोधनासाठी ते जिल्हाभर प्रवास करत असतात. पेशाने ते स्थापत्य अभियंता असून त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी पत्रकारितेची पदविका ९२ % गुण मिळवून पूर्ण केली.लेखन हा त्यांचा छंद असून ते विविध विषयांवर लेखन करत असतात.सध्या ते तासगांव शहराचा इतिहास लिहीत आहेत. त्यांची लेखनशैली अतिशय साधी सोपी असून सोशल मिडीया वर सध्या त्यांचा एक वेगळा वाचकवर्ग तयार होत आहे.ते ‘साप्ताहिक विजयंत’ साठी सुध्दा लेख पाठवत असतात. त्यांच्या या सर्व कामांची दखल घेवून प्रतिष्ठा न्युज व झिंदाबाद प्रतिष्ठानने त्यांना समाजरत्न पुरस्कार दिला. म्हणून लक्ष्मी नारायण नागरी सह.पत संस्थेने त्यांचा सत्कार केला.गेली अठ्ठावीस वर्षे या पत संस्थेला ऑडीट वर्ग अ मिळत असून जिल्ह्यातील नामांकित पत संस्थांमध्ये या संस्थेची गणना होत आहे.जगदीश कालगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था हळूहळू मोठी होत आहे. सभेला सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेचे  सूत्रसंचालन संस्थेचे संचालक लक्ष्मण तथा एल.के.जोशी यांनी केले.तर अथर्व जोशी यांनी आभारप्रदर्शन केले.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.