प्रतिष्ठा न्यूज

तृतीयपंथीयांचा सामाजिक स्तरावर स्वीकार होणे गरजेचे : न्या.डॉ.आर. एस.कुळकर्णी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती तासगांव यांचेमार्फत आयोजित आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय तासगांव येथे साजरा झाला.त्यामध्ये बोलताना न्या. डॉ. आर. एस. कुळकर्णी यांनी बोलताना तृतीयपंथी या समाजाचा घटक आहेत राज्यघटनेने त्यांना समानता दिली आहे आरक्षण दिले आहे,पण समाजात अजुनही त्यांची स्वीकार्यता वाढलेली नाही या सर्व फायद्यातोट्याच्या पलिकडे जाऊन त्यांचा समाजात स्वीकार होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.यावेळी कॉलेजचे प्राचार्य संजय परदेशी,पी. एस.आय.संदिप गुरव,सह मान्यवर उपस्थीत होते. डिजीटल मिडीयातील पहिल्या ट्रान्सजेंडर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते सोनल जाधव बोलताना म्हणाल्या की,समाजातील दुर्लक्षित व उपेक्षित घटक ट्रान्सजेंडर आहे माणूस म्हणून जन्म झाला असला तरी माणूस म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार नाही, समाजामध्ये जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो,दोन वेळचं पोट भरण्यासाठी कोण काम देत नाही, कागदोपत्री आरक्षण मिळालं असलं तरी समाजात स्वीकार होत नाही. सार्वजनिक ठिकाणी तुच्छ नजरेनं लोक पाहत असतात,त्यांना कोणी समजून घेत नाही.चाइल्ड हेल्पलाईन चे समन्वयक इम्तीयाज यांनी बोलताना मुळात आमचा संघर्ष शरीर व मन यासोबत जन्मतःच सुरु असतो. पण जसजसे वय वाढत जाईल तसा हा संघर्ष समाजासोबत सुरु होतो. समाजाकडून होणारा भेदभाव व वाईट वागणूक यामुळे समाज आमचा आम्ही आहे तसा स्वीकार का करत नाही असा प्रश्न पडतो.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी. एस. आय. संदिप गुरव यांनी केले.कार्यक्रमाचे संयोजन श्री संजय गवळी व कॉलेज स्टाफ यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.