प्रतिष्ठा न्यूज

संगमनेर शांत आहे ; अफवांवर विश्वास ठेऊ नका .. पोलीस उप अधिक्षक सोमनाथ वाघचौरे

प्रतिष्ठा न्यूज / ज्ञानेश्वर गायकर पाटील
अहमदनगर : काल संगमनेर मधे दोन विविध घटनेत जातीय धार्मिक तणाव वाढेल असे कृत्य काही व्यक्ती कडून केले गेले , त्या नंतर दोन गटात तणाव निर्माण झाला असताना , संगमनेर चे पोलीस उप अधिक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक श्री मथुरे यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रात आणून शांतता प्रस्तापित केली आहे . जोर्वे नाका व लक्ष्मी नगर येथे वयक्तिक वादातून धार्मिक तेढ निर्माण होईल अश्या दोन घटना घडल्या होत्या . पोलिसांनी अत्यंत सतर्क राहून दोषी वर गुन्हे नोंद करुन शांतता प्रस्तापित केली आहे . व्हॉट्स अप, व अन्य समाज माध्यमावर पोलिसांची कडक नजर असून , अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करतील असा गर्भित इशारा ही पोलिसांनी दिला आहे . नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये , अफवा वर विश्वास ठेवू नये असे अहवान पोलीस दला तर्फे करण्यात आले आहे . ज्या ठिकाणी घटना घडल्या तिथे कडक नजर पोलीसांची असून दोषी वर योग्य कारवाई केली जाईल असे ही संगमनेर पोलिसांनी सांगितले आहे , दोन्ही समाज बांधवत सलोखा निर्माण होलील अशी भूमिका पोलिसांनी घेतली असून ,अशांत संगमनेर नको अशी सर्व सामान्य नागरिकांची भूमिका असल्याचे प्रत्यक्ष प्रतिनिधी यांनी घटना स्थळी भेट देऊन नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे , दोषींना पोलीस योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ही नागरिकांनी केली आहे . ह्या घटनेत काही आरोपींना अटक केली असून , नागरिकांनी शांतता बाळगावी अशी माहिती पोलिसांनी दिली आहे . ज्या तरुणाला मारहाण केली त्या ८ आरोपींचा पोलीस कसून तपास करत असून , त्यांना विविध कलमाद्वारे जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच शश्र कायदे अंतर्गत योग्य ते गुन्हे स्थानिक पोलीस स्टेशन ला दाखल केले असून , दोषीवर पुढील कार्यवाही कडक होईल , नागरिकांनी अफवा वर विश्वास ठेऊ नये , कोणी अफवा पसरवीत असेल तर पुढील कारवाई करू असे श्री सोमनाथ वाघचौरे संगमनेर पोलीस अप अधिक्षक वाघचौरे यांनी सांगितले .. सध्या शहरात कुठलाही तणाव नसून , जनजीवन सुरळीत आहे .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.