प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार संघटनेकडून सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा ग्रीन उपक्रमाबद्दल सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार संघटनेकडून सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका चे आयुक्त व प्रशासक शुभम गुप्ता यांचा ग्रीन उपक्रमाबद्दल सत्कार करून अभिनंदन करण्यात आले*

आयुक्त मा. शुभम गुप्ता साहेब यांनी आपल्या व्हीजिटिंग कार्ड च्या माध्यमातून सुरू केलेल्या ग्रीन उपक्रमाबद्दल हा सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थी संघटनेचे शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव म्हणाले की ” आमचे नेते व राष्ट्रवादी काँगेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब , पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमची विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या विषयावर व प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवत असते , पण हे करत असताना पर्यावरण पूरक वृक्षारोपण सारखे अनेक सामाजिक उपक्रम ही पक्षाकडून कायम च राबिवले जात असतात , त्यामुळे माननीय आयुक्त साहेब यांनी हाती घेतलेल्या आगळ्या वेगळ्या पर्यावरणपूरक उपक्रम हा नक्कीच शहराला चांगली दिशा दाखवणारा असेल त्याबद्दल आम्ही त्यांचा अभिनंदन पत्र व रोप देऊन आज सत्कार केला आहे. ”

यावेळी विद्यार्थी शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव ,व्रजेश पडियार , दिग्विजय माळी ,सागर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.