प्रतिष्ठा न्यूज

रॉयल युथ फाऊंडेशन तासगाव यांचे कडून शिवजयंती निमित्त रक्तदान आणि आरोग्य शिबीर संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आज शिवजयंती निमित्त रॉयल युथ फॉउंडेशन तासगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जात-पात धर्म व राजकारण विरहित अशी रॉयल फाउंडेशनचीं ओळख आहे.याचाच एक भाग म्हणून डबास गल्ली  बेलबाग येथे भव्य असे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी 102 रक्त दात्यांनी रक्तदान केले.तसेच अनेक नागरिकांनी आरोग्य शिबिरात शारीरिक तपासनी करुन घेतली.रॉयल फाउंडेशनचे हा हेतू पाहून तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी सर्वप्रथम स्वतः रक्तदान करून शुभेच्छा दिल्या.यावेळी तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे,बी डी ओ मोहिते, रुग्णसेवक निसार मुल्ला, तलाठी पतंग माने,संतोष बेले,दिग्विजय पाटील,रोहन पोळ,अरमान पठाण,सचिन पोळ,अशपाक पठाण,सोहेल मुलानी,स्वप्नील चव्हाण,रवी सुतार,छोटू विभुते,गुरू पाटील,संतोष सुतार, दिलावर मुजावर व मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.