प्रतिष्ठा न्यूज

तासगाव मुख्याधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून पालिके मार्फत भिवघाट रोडवर वारकरी शिल्पची उभारणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : स्वच्छ तासगाव सुंदर तासगावची हाक देत पालिकेने शहरातील स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी कल्पकता लढविली आहे.त्यासाठी शहरातील अनेक ठिकाणी वेगवेगळे शिल्प उभे करून सुशोभीकरणं करण्यात आले आहे.शहरातील मुख्य चौकांसह अनेक ठिकाणी सुशोभीकरणाचा धडाका पालिकेने लावला आहे.त्याच अनुषंगाने आज शहरातील भिवघाट रोड (पंढरपूर वारी मार्गावर) मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून पालिके मार्फत उभारण्यात आलेल्या वारकरी शिल्पाचे उद्घाटन शहरातील जेष्ठ वारकरी दांपत्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.वारकरी संप्रदयाचा सन्मान म्हणून पंढरपूर वारीमार्गावर या शिल्पाची उभारणी नगरपरिषद मार्फत करणेत आली आहे.तासगाव शहरातील जेष्ठ वारकरी श्री व सौ जयंतराव शंकर वडे या दांपत्यांच्या हस्ते या शिल्पाचे उद्घाटन करण्यात आले.त्यामुळे शहराच्या सौंदर्यात निश्‍चितपने भर पडली आहे.यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित होता.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.