प्रतिष्ठा न्यूज

तासगावात गुंठेवारी प्लॉट नियमितिकरणात घोटाळा; मनसेची जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीचीं मागणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहरात गुंठेवारी प्लॉटचे नियमबाह्य पद्धतीने नियमितीकरण करण्यात आले आहे या प्रकरणाची उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कडून चौकशी करून कारवाई करा अशी मागणी मनसेचे रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष अमोल काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की तासगाव शहरात सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा किमतीत अनेक ठिकाणी गुंठेवारी प्लॉट पाडून अनेकांकडून विकले गेलेत.प्लॉट पाडताना कोणतेही नियम नव्हते त्यामुळे मोकळी जागा,नाले,रस्ते, पथदिवे इत्यादी कोणत्याही सुविधा उपलब्ध न करता या प्लॉटच्या विक्री करण्यात आल्या आहेत.शेतजमीनीचे तुकडे पाहून अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सर्वसामान्याना विकणाऱ्या बिल्डरांचा धंदा आणि यात होणारी सर्वसामान्यांची होरपळ थांबविण्यासाठी या सर्व प्रकाराला लगाम घालण्यासाठी सरकारने महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडेजोड एकत्रीकरण कायदा १९४७ च्या माध्यमातून शेतकरी,बिल्डरांना अनाधिकृत प्लॉटिंगला लगाम लावला होता.तुकडे बंदीच्या परीपत्रकामुळे अशा गुंठेवारी प्लॉटचे खरेदी विक्री व्यवहार बंद झाले.परिणामी गुंठेवारी नियमितीकरण करणे बंधन कारक झाले परंतु हे करत असताना २०२० पूर्वीच्या खरेदी केलेले प्लॉट नियमितीकरण करण्यास परवानगी असताना सुध्दा २०२० नंतरच्या खरेदी दाराना नियमितीकरण करून देण्यात आले आहे.मात्र हे करताना शासनाचे सगळे नियम गुंडाळून ठेवत कोणतेही नियम न पाळता अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणच्या अनेक प्लॉट धारकांना नियमितीकरण करून दिलेले आहे. वास्तविक पाहता नियमितीकरण करताना दोन प्लॉटच्या मध्ये ९ मीटर रस्ता असणे गरजेचे आहे असा
नियम आहे.परंतु अनेक ठिकाणच्या गुंठेवारी क्षेत्रात चार मीटर,सहा मीटर रूंदीचे रस्ते आहेत.अशा ठिकाणी एखादया प्लॉट धारकाला जर स्वतःचा प्लॉट नियमितीकरण करायचा असेल तर ९ मीटर रस्ता असणे गरजेचे आहे. आणि नसेल तर संबंधीत समोरच्या प्लॉट धारकांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी रस्ता ९ मीटर दाखवून नियमितीकरण करू शकेल,असे असताना अनेक ठिकाणी संबंधित प्लॉट धारकांच्या परवानगी शिवाय प्लॉट धारकांच्या जागेत त्या क्षेत्रातील नकाशावर रस्ता दाखवून खुणा करून अनेकांचे गुंठेवारी नियमितीकरण पालिकेने करून दिलेले आहे. अशावेळी ज्याने नियमितीकरण केले नाही त्यांच्या प्लॉट मध्ये कमी पडत असलेला रस्ता दाखवण्यात आला आहे.नियमितीकरण केलेला आणि न केलेला या दोन्ही प्लॉट धारकांना नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण पालिकेने कोणतीही चौकशी न करता कोणत्या उद्देशाने नियमितीकरण करून दिले हे समजायला तयार नाही.तसेच १००/- रूपये च्या स्टॅम्प पेपरवर अन रजिस्टर साठेखतवर बऱ्याच प्लॉटचे नियमितीकरण केलेले आहे. ले-आऊटवर नोंदणीकृत इंजिनिअरचे शिक्के आहेत परंतु सहया मात्र संबंधीत इंजिनिअरच्या नसून त्या सहया बोगस असल्याच्या दिसून येत आहेत.तसेच वडिलार्जीत जमीनीचे खरेदीपत्र नसतानाही तासगाव शहरामध्ये नियमितीकरण करणेत आले आहे.हा सगळा प्रकार नगर रचना सहाय्यक हाळीकर यांनी अर्थिक लोभापोटी हा सगळा गैर प्रकार केलेला आहे.तरी या विषयात आपण स्वतः लक्ष देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तासगांव नगरपालिकेच्या समोर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा अमोल काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.