प्रतिष्ठा न्यूज

कंधार तालुक्यातील पेठवडज आणि मुखेड तालुक्यातील सांगवी येथे मराठा आरक्षणासाठी युवकांचे जलसमाधी आंदोलन

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : मुखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून मंगळवारी तालुक्यातील बाराहाळी, हातराळ, दापका गुंडोपंत, सलगरा फाटासह मुखेड येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले, तर सांगवी भादवे येथील ५० युवकांनी लेंडी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले. तसेच कंधार तालुक्यातील युवक, शाळकरी विद्यार्थी यांनी येथील तलावात उतरून अर्धनग्न जलसमाधी आंदोलन केले. एकच मिशन, मराठा आरक्षण अशी घोषणा करण्यात आली.
कंधार, मुखेड तालुक्यातील व्यापार,बाजार पेठ कडकडीत बंद होती, तर दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माकणी येथील ७५ वर्षीय आत्माराम भाटापुरे व बिल्लाळी येथील अविनाश इंगळे हे उपोषणाला बसले आहेत. सांगवी भादवे येथील युवकांनी लेंडी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.