प्रतिष्ठा न्यूज

श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तासगाव आयोजित शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तासगांव आयोजित शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराचा आज सांगता समारंभ उत्साहात पार पडला.गेले आठ दिवस सुरु असलेले मर्दानी खेळाचे शिबिर अत्यंत उत्साहात व प्रसन्न वातावरणात संपन्न झाले.
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तासगांव आयोजित दिनांक 04/11/2022 ते 10/11/2022 रोजी सुरु असलेले *शिवकालीन युद्धकला(मर्दानी खेळ)* शिबिराचा आज सांगता समारंभ उत्साहात पार पडला.
शिबिरामध्ये तासगांव तालुक्यातुन तरुण युवक युवतीनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.*प्रशिक्षणसाठी छावा मर्दानी आखाड़ा टोप संभापुर चे वस्ताद श्री चंद्रकांत दादा पोर्लेकर,स्वप्निल दादा शेळके यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले.* समारोप प्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थिनी प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक मा.श्री.नितिन दादा चौगुले यांनी युवकांना मर्दानी खेळाबद्दल व   आपल्या भारतीय संस्कृती विषयी मार्गदर्शन केले.* तसेच या खेळाचे सातत्य राखण्याबाबात आवाहन केले. यावेळी शुभम माने,किरण जाधव, प्रदीप थोरबोले,अभिजीत कोळेकर,प्रशांत पाटील,अमोल पाटिल,संजय एडके,पै.मोहन शिंदे,व युवा सहकारी उपस्थित होते.
यावेळी इथून पुढेही प्रत्येक रविवारी प्रशिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तासगांव  यांनी घेतला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.