प्रतिष्ठा न्यूज

मराठा स्वराज्य संघाच्या कुपवाड शहराच्या अध्यक्षपदी सत्वशील पाटील यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी :  मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव साळुंखे ( बापू) यांच्या हस्ते मराठा स्वराज्य संघाच्या कुपवाड शहरा च्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व तरुणांना एकत्र करून त्यांच्या हाताला काम देणारे युवक कार्यकर्ते व सामाजिक कार्याची आवड असणारे सत्वशील पाटील यांना निवडीचे पत्र दिले.
या वेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील, राजेश पाटील, काशिनाथ आलदर, डॉक्टर श्रीकांत भोसले, व इतर या वेळेला सत्वशील पाटील यांनी माझ्या सामाजिक कार्याची व आतापर्यंत केलेल्या कामाची दखल घेतल्याबद्दल व माझी मराठा स्वराज्य संघाच्या कुपवाडच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव (बापू) साळुंखे व मराठा स्वराज्य संघाचे राज्याचे प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांचे मनापासूनआभार मानतो व या पुढील काळात रस्त्यावर उतरून मराठा समाजातील गरीब पिचलेल्या ,दबलेल्या व शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आरक्षणासाठी वाटेल ते काम करण्याची माझी तयारी आहे व छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोसारी याच्या धोतरात विषारी साप सोडण्याची जबाबदारी माझ्यावर द्यावी व ती पूर्ण करण्यासाठी माझा प्राण गेला तरी बेहत्तर, वाटेल ती मी किंमत सोसायला तयार आहे.मी ते करेन अशी मी या ठिकाणी शपथ घेतो असे सांगितले .
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.