प्रतिष्ठा न्यूज

कोल्हापूर कडे बारा लाखाची दारू वाहतूक करणारा ट्रक जप्त

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
कोल्हापूर, ता.१० :  गोव्याहून कोल्हापूरकडे बारा लाखाची वाहतूक करणारा ट्रक सह २० लाखाचा मुद्देमाल  चेक नाक्यावर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालक व क्लीनर वर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.
करुळ  येथे चेक नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलीस हवलदार नितीन खाडे हे नेहमीप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. त्याचवेळी गोव्याहून कोल्हापूरकडे जाणारा लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच बारा एच डी २६४४ तपासणीसाठी थांबवला असता, ट्रकच्या हौदयात  लपवून ठेवलेले बॉक्स आढळले.सदर बॉक्स मध्ये गोवा बनावटीची दारू असल्याचे लक्षात आले.
वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी पंचनामा करून ट्रकचालक अमीर गुलाब तांबोळी  वय २६ व रोहित रोहिदास समदडे वय ३२ राहणार पाटोदा, जिल्हा उस्मानाबाद यांचे वर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक मारुती साखरे करत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.