प्रतिष्ठा न्यूज

संभाजी भिडे यांच्या गांधीजीवरील वक्तव्याचा सांगलीत काँग्रेससह विविध पुरोगामी पक्ष व संघटनांकडून जाहिर निषेध व कारवाईची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. ३१ : महात्मा गांधीजीं विषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर शासनाने तातडीने कायदेशीर कारवाई करावी यासाठी आज सांगलीच्या स्टेशन चौकात काँग्रेससह विविध पुरोगामी पक्ष आणि संघटना यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आणि अहिंसा प्रेमींनी भिडेंचा निषेध करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली.
प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर आंदोलन स्थळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. बाबुराव गुरव व पद्माकर जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी यांच्या विषयी अपशब्द वापरलेल्या व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, बापू हम शरमिंदा है.. तेरे खातीर जिंदा है, वंदे मातरम, इन्किलाब जिंदाबाद, गांधीजी अमर रहे, लोकशाही, स्वातंत्र्य व संविधानाचा विजय असो इ. घोषणासह महापुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणांनी स्टेशन चौक दणाणून गेला.

यावेळी डॉ. बाबुराव गुरव यांनी प्रास्ताविकात महात्मा गांधी यांचे विचार व तत्वज्ञानाचा जागर करुन त्यांना अभिवादन केले व त्यांची बदनामी करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीचा शांतता व अहिंसक मार्गाने निषेध करुन शासनाला गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी हे आंदोलन आहे असे सांगितले.

आमदार विक्रम सावंत यांनी महापुरुषांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही. अशा समाजविघातक प्रवृत्ती लोकशाही व स्वातंत्राचे शत्रू असतात, त्याचा शासनाने बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी केली.

शंकरराव पुजारी म्हणाले, राष्ट्रपुरुषांच्या बदनामीमागे या बोलवता धनी कोण आहे हे लोकांना समजले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निंदनीय प्रकार घडला आहे. जनतेतून तीव्र विरोध व संताप व्यक्त होत आहे.

पद्माकर जगदाळे म्हणाले, गेली वर्षभर सांगलीतील एक व्यक्ती सातत्याने इतिहासाची मोडतोड करून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी विकृत वक्तव्ये करीत आहे. जातीद्वेष करुन समाजातील वातावरण कलुषित करुन मूळ जनतेच्या महत्वाच्या समस्यावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार महाराष्ट्राला आवडलेला नाही. भारताला गुलामगिरीतून मुक्त करुन स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या गांधीजींचा अवमान हा देशाचा अवमान आहे. बेजबाबदार व अश्लाघ्य भाषेत महापुरुषांची बदनामी केलेल्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी अशी आमची जोरदार मागणी आहे.

श्रीमती शैलाभाभी पाटील, संपतराव पवार, सुरेश दुधगावकर, यांनी महापुरुषांची बदनामी करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त केले.

यावेळी वि. द. बर्वे, प्रा. एन.डी.बिरनाळे, अशोकसिंह रजपूत, महेश साळुंखे, संजय पाटील, बिपीन कदम, रवी खराडे, आशिष कोरी, सनी धोतरे, शेरुभाई सौदागर,अल्ताफ पेंढारी,अकबर शेख, करीम मुजावर, अजय देशमुख, नितीन चव्हाण, उदय कदम, उत्तम सुर्यवंशी, आशिष चौधरी, प्रशांत अहिवळी, राजेंद्र कांबळे, बी. पी. बनसोडे, किरणराज कांबळे,आबा जाधव, दिलीप पाटील, संजय सुर्यवंशी, आबा पाटील,बंडू सरगर, रवींद्र वळवडे, विकास मगदूम, सुकुमार मगदूम, देशभूषण पाटील, बाबगोंडा पाटील, महावीर पाटील, ताजुद्दीन शेख, मनोज पवार, मुनीर मुल्ला, मौलाली वंटमुरे, प्रकाश जगताप, धनंजय खांडेकर, योगेश जाधव, आयुब निशानदार, मालन मोहिते, शेवंताताई वाघमारे,शमशाद नायकवडी, प्रणिता पवार, ज्योती आदाटे, भारती भगत,कांचन खंदारे, मनोज सरगर, अमर निंबाळकर, प्रतिक राजमाने, आनंदा लेंगरे, अशोक रासकर,प्रमोद सुर्यवंशी, याकुब मणेर, मंदार काटकर, आल्बर्ट सावर्डेकर, महेश खराडे, मुनीर मुल्ला, संजय मेंढे, संजय कांबळे, प्रशांत सदामते, युवराज पाटील, बी. एम. पाटील, सतिश साखळकर, सागर काळे, पुरुषोत्तम दोरकर, अजित भांबुरे, सचिन चव्हाण समीर मुजावर, चेतन पाटील गंगाधर तोडकर, योगेश जाधव, गौतम निरंजन, मनोज नांद्रेकर, मारुती देवकर, अर्जुन मजले, विक्रम कांबळे, सलिम मुल्ला, गणेश कोडग, बाबासाहेब कोडग,सुभाष तोडकर, निखिल वठारे,आदिनाथ मगदूम, सुलेमान मुजावर, अमोल पाटील, मन्सूर नदाफ, राजू पाटील, रमेश जाधव, गणेश घोरपडे व विविध पुरोगामी पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते व सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष कोरी यांनी केले व नगरसेवक संतोष पाटील यांनी आभाराने आंदोलनाची सांगता केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.