प्रतिष्ठा न्यूज

तासगावात मटक्याने अनेक तरुण कर्जबाजारी… झटपट पैशाच्या अमिषाने अडचणीत

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव तालुक्यात मटका व्यवसाय मोठया प्रमाणात फोफावला आहे.मटका खेळणारे भिकेकंगाल होऊन त्यांचे संसार देशोधडीला लागले आहेत, मात्र मटका बुकि,एजंट,मालक मात्र मालामाल झाले आहेत.राजरोसपणे लाखो रुपयांची उलाढाल मटक्यातून होत असून पोलीस मात्र याकडे कानाडोळा करत आहेत.शहरातील गल्ली बोळात खुले आमपने अगदी दुकानें थाटून मटका घेतला जात आहे.ओपन क्लोज च्या विळख्यात शहरासह तालुक्यातील तरुणाई बरबाद होताना दिसत आहे.तासगाव पोलिसांच्या आशिर्वादाने मटका सुरु असल्याचे बोलले जात आहे.पोलिसांचा वरद हस्त आणि लाखो रुपयांचा हप्ता सुरु असल्याने पोलीस यंत्रणा आमच्या खिशात आहे अशा अविर्भावात मटका बुकी मालक फिरत आहेत.या खेळाच्या नादात अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.कर्ज बाजारी होऊन अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेला लाखो रुपयांचा मटका घेणारा बुकी सोडून लहान लहान बुकींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापलीकडे पोलिसांकडून कोणतीही मोठी कारवाई होताना आतापर्यंत दिसून आली नाही.प्रशासनाच्या राजाश्रयाने सुरु असलेला मटका पूर्णपने बंद होणार कां?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.