प्रतिष्ठा न्यूज

संयोगिता पाटील केंब्रिज स्कूलमध्ये एकांकी नृत्य स्पर्धा उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज मध्ये एकांकी नृत्य स्पर्धा उत्साहात साजरी झाला. प्रथम सरस्वती पूजनाने स्पर्धा सुरू करण्यात आल्या. प्रमुख परीक्षक म्हणून स्कूलची माजी विद्यार्थिनी मयुरी यल्लटी आणि जयश्री बिरंगे या लाभल्या.
या एकांकी नृत्य मध्ये स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय आणि पाश्चात्त्य नृत्याचे प्रकार सादर केले. यामध्ये प्रथम क्रमांक तनवी माळी, द्वितीय क्रमांक पियुष टोमके, तृतीय क्रमांक विभागून उरवी कोष्टी व भावेश साजिदा तसेच उत्तेजनार्थ चिन्मय पोळ यांना मिळाले व विजेत्यांना पारितोषिके परीक्षकांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास अधीक्षिका ख्रिस्टीना मार्टिन, मुख्याध्यापक, साहेबलाल शरीकमसलत तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरिफा भोकरे तसेच आभार प्रदर्शन वसिमा मॅडम यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.