प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे पैलवान ग्रुप पॉवर ऑफ फ्रेंड सर्कल आणि शिवकेसरी प्रतिष्ठान यांच्याकडून भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगांव येथे शिवजयंती निमित्त पैलवान ग्रुप पाॅवर ऑफ फ्रेंड सर्कल आणि शिव केसरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅट वरील कुस्ती स्पर्धेचे क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेक लहान मोठ्या कुस्त्या मोठया उत्साहात पार पडल्या.यावेळी झालेल्या पहिल्या मानाच्या कुस्तीत 120 किलो वजनी गटात पैलवान किशोर पाटील याने शिव केसरी मानाची चांदीचीं गदा आणि बक्षीस पटकवले, पहिल्या क्रमांकासाठीची चांदीची गदा आणि रोख बक्षीस रक्कम माननीय महादेव नाना पाटील व माननीय हिंदुराव जाधव यांनी पुरस्कृत केली होती. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पैलवान अक्षय देवकर याने पटकावले यासाठी आर आर पाटील प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य हे पुरस्कृत होते,तिसरा क्रमांक पैलवान बापू पवार यांनी पटकवला तिसऱ्या बक्षीस साठी पैलवान मारुती भाऊ जाधव हे पुरस्कृत होते.लहान 35 किलो वजनी गटात पै रोहित माळी हा विजयी झाला, यासाठी रोख बक्षीसासाठी पै. मारुती भाऊ जाधव हे पुरस्कृत होते. यावेळी पंच म्हणून पै.सागर मडले, पै. सुनील आप्पा चंदनशिवे, पै.विशाल मोहिते, पै.प्रीतम पाटील, पै.सुमित जाधव, पै.सुरज जाधव,पै भूषण जाधव, यांनी कामं पाहीले.
यावेळी प्रमुख उपस्थिती अंतरराष्ट्रीय कुस्ती कोच आदरणीय पै.उत्तमराव पाटील सर,डबल महाराष्ट्र केसरी आदरणीय पै.चंद्रहार दादा पाटील, पैलवान ग्रुप संस्थापक अध्यक्ष आदरणीय पै.मारुती भाऊ जाधव, सांगली जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय मा राजेन्द्र तात्या शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक संचालक मा सुरेश भाऊ पाटील, सांगली जिल्हा युवा नेते आदरणीय मा प्रभाकर बाबा पाटील, सांगली जिल्हा युवा नेतेआदरणीय मा सागर दादा वनखंडे, तासगांव माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे, तासगांव माजी नगराध्यक्ष दिनकर दादा धाबुगडे, तासगांव माजी नगराध्यक्ष आदरणीय मा महादेव नाना पाटील, बाजार समिति संचालक आदरणीय मा दिनकर आप्पा पाटील, सरपंच परिषद अध्यक्ष आदरणीय मा प्रदिप भाऊ माने, पैलवान ग्रुप मिरज अध्यक्ष आदरणीय पै मोहन भाऊ शिंदे, अजय दादा पवार, पैलवान ग्रुप सदस्य बबलु पाटील, पैलवान ग्रुप सदस्य मा प्रमोद भैय्या भोसले, अभिषेक देशिंगकर, आदरणीय अमोल भाऊ कदम, धनंजय मदने, आदरणीय पै अनिल दादा बोरकर, महाराष्ट्र चॅम्पीयन आदरणीय पै सादिक भाई पटेल, पैलवान ग्रुप सदस्य आदरणीय रणजीत भाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. हजारो कुस्ती प्रेमी, सामाजिक, राजकीय, क्रीडा, शिक्षण, उद्योग क्षेत्रातील मान्य वर कुस्ती शौकीनांच्या उपस्थितित कुस्ती स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाल्या.
आयोजन पैलवान ग्रुप सांगली जिल्हा अध्यक्ष पै लक्ष्मण भाऊ मंडले यांनी केले.
पैलवान ग्रुप शहर तालुका अध्यक्ष पै सुशांत दादा जाधव, पाॅवर ऑफ फ्रेंड सर्कल संस्थापक मा गजुभाऊ घाटगे, पाॅवर ऑफ फ्रेंड सर्कल अध्यक्ष सुशांत उर्फ गोल्डन जाधव विशेष सहकार्य रामभाऊ देशमुख
निवेदन विक्रांत भाऊ पाटील आणि मायकल चिपरीकर यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.