प्रतिष्ठा न्यूज

“विश्वाचे तुम्ही स्वामी” या स्वामी गीताचे अनावरण

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली: आर.आर.फिल्म्स प्रस्तुत विश्वाचे तुम्ही स्वामी या स्वामी समर्थांच्या नवीन गीताचे अनावरण अक्कलकोट देवस्थान अध्यक्ष महेश इंगवले यांच्या शुभहस्ते अक्कलकोट स्वामी मठात करण्यात आले.
         विश्वाचे तुम्ही स्वामी या गीताचे निर्माता डॉ.सुरज पोतदार, गीतकार राहुल वेदपाठक, गायन शुभम खंडाळकर, संगीत राहुल वेदपाठक, शुमम खंडाळकर,ध्वनीमुद्रण जय मल्हार स्टुडिओ गीतासाठी विषेश सहकार्य अमोल कोरे, राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
         स्वामी समर्थांच्या या नवीन गीताची भक्तांना मोठी उत्कंठता आहे. हे गीत सर्वच स्वामी भक्तांना आवडेल आणि हे गीत अनेक गीतांचे विक्रम मोडेल असे प्रतिपादन अध्यक्ष महेश इंगवले यांनी केले व आर.आर.फिल्मस् सर्वच कलाकारांचा सन्मान संस्थानच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी गीतकार राहुल वेदपाठक, राजेंद्र वेदपाठक, संगीता वेदपाठक, सुनंदा वेदपाठक, दिव्या वेदपाठक, विकास चव्हाण, एम.आर.पाटील इ.उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.