प्रतिष्ठा न्यूज

जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशाचा पल्ला गाठता येतो : आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री जाधव

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : जिद्द, चिकाटी, मेहनत, अभ्यासात सातत्य यांमुळे यशाचा पल्ला निश्चित गाठता येतो असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पॅराऑल्मपिक खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव यांनी यांनी केले.
शहरातील राजर्षी शाहू विद्यालया व ज्यू.काॅलेज मध्ये भाग्यश्री जाधव यांचा शाळेच्या वतीने शोध नवदुर्गा चा या उपक्रमात सहशिक्षीका श्रीमती सुनीता पावसे, प्राचार्य बी.एम. हंगरगे, उपप्राचार्य डॉ.यमलवाड, पर्यवेक्षक पंजाबराव सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बी.एम.हंगरगे हे होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलतांना भाग्यश्री जाधव म्हाणाल्या की, विद्यार्थी मित्रांनो,तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुम्हांला शिकविण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी गुरुजी आहेत. मी शाळेत नसतांना सुद्धा यश मिळाले. मला जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड नी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचता आले आहे. त्यांचे आशिर्वाद माझ्या पाठीसी आहेत.
या शाळेतील आता गुरुजी नी त्यांच्यात असलेले सुप्त गुण ओळखून विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू पोहोचले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
त्या पुढे म्हणाल्या की, मी ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातून पुढे आलेली विद्यार्थ्यांनी आहे. दोन वेळेसच्या जेवणाचा प्रश्न, भुकेची समस्या होती. पण ध्येय गाठण्यासाठी गरीबी आड येत नाही. विद्यार्थ्यांनी आशावादी, सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवा. यश नक्की मिळते. अशी ग्वाही त्यांनी दिली.
माझा नवदुर्गा म्हणून शाळेने गौरव केला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान आतापर्यंत दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांना राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, सामाजिक संघटना यांच्याकडून 125 पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री जाधव यांच्या हस्ते शिक्षकेतर कर्मचारी लताबाई जाधव यांचा नवदुर्गा महणून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत,कस्तुरबा गांधी विद्यालय मु.अ.श्री बी.डी.देशमुख, श्री सुर्यकांत टापरे, सहशिक्षक श्री आनंद मोरे,नागनाथ केंद्रे, शिवानंद टापरे, श्री अशोक गळेगावे, राजेश कदम,रत्नाकर कोत्तापल्ले, संतोष बिरादार,गोपाळ मोरे,राजेश मोरे ग्रंथालय प्रमुख श्री सोनाजी वाडेकर, सहशिक्षीका श्रीमती निर्मला खुळे, श्रीमती सुनीता पावसे, शिक्षकेत्तर कर्मचारी वैजनाथ आर्दड, धनाजी बस्वदे, श्री आर.आर.महालिंगे, श्री टी.एन. वाघमारे श्रीमती लक्ष्मीबाई वानोळे, श्रीमती लताबाई जाधव, मथुराबाई घोडेकर आदिजण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री शिवानंद टापरे यांनी केले तर आभार एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ.माणिकराव गाडेकर यांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.