प्रतिष्ठा न्यूज

आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर आवश्यकता असेल तरच करावा – महापौर जयश्री पावडे

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला.मात्र विद्यार्थ्यांनी आवश्यकता वाटल्यास अभ्यासाचे साधन म्हणून वापर करावा असे आवाहन नांदेड- वाघाळा शहर महानगर पालिका महापौर तथा प्रथम नागरिक सौ जयश्री निलेश पावडे यांनी केले.
शहरातील राजर्षी शाहू विद्यालया व ज्यू.काॅलेज मध्ये महापौर सौ पावडे यांचा शाळेच्या वतीने शोध नवदुर्गा चा या उपक्रमात सहशिक्षीका श्रीमती कांता जायेभाये,प्राचार्य हंगरगे,उपप्राचार्य डॉ.यमलवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बी.एम.हंगरगे हे होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलतांना महापौर सौ जयश्री पावडे म्हाणाल्या की, विद्यार्थ्यांनी प्राथमिक,माध्यमिक शिक्षण घेतांना आवश्यकता असेल तरच वापर करावा. भविष्यात महाविद्यालय शिक्षण घेतांना मोबाईल वापरावा लागतो.
सध्या मोबाईल वापराबाबत विद्यार्थ्यी आणि पालकांना समुपदेशन करण्याची नितांत गरज आहे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत,कस्तुरबा गांधी विद्यालय मु.अ.श्री बी.डी.देशमुख,श्री सुर्यकांत टापरे, सहशिक्षक श्री आनंद मोरे,नागनाथ केंद्रे, शिवानंद टापरे, श्री अशोक गळेगावे, राजेश कदम,रत्नाकर कोत्तापल्ले, संतोष बिरादार,गोपाळ मोरे,राजेश मोरे ग्रंथालय प्रमुख श्री सोनाजी वाडेकर,सहशिक्षीका श्रीमती निर्मला खुळे,श्रीमती सुनीता पावसे, शिक्षकेत्तर कर्मचारी वैजनाथ आर्दड, धनाजी बस्वदे, श्री आर. आर. महालिंगे, श्री टी.एन. वाघमारे श्रीमती लक्ष्मीबाई वानोळे, श्रीमती लताबाई जाधव, मथुराबाई घोडेकर आदिजण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री शिवानंद टापरे यांनी केले तर आभार एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ.माणिकराव गाडेकर यांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.