प्रतिष्ठा न्यूज

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना १५ लाख २० हजार अनुदान वितरण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासनाकडून महानगरपालिकेस रु.१५ लाख २० हजार चा प्राप्त निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर नुकताच जमा करण्यात आला असून या योजनेअंतर्गत रु.१७ लाख ८० हजार मात्र निधी नव्याने उपलब्ध झाला असून त्याचे वितरण या आठवड्यात करणेत येत असून त्यामध्ये सन २०१९ च्या पूरामध्ये बाधित एकूण ६० घरापैकी १४ घरांसाठी निधी उपलब्ध झालेला आहे.मा.आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या सहकार्याने उर्वरीत निधी लवकरात लवकर उपलब्ध होणार असून आयुक्त मा.नितीन कापडणीस यांचे मार्गदर्शनाखाली सहा.आयुक्त मा.दत्तात्रय गायकवाड कार्यालयीन अधिकारी प्रसाद जामसांडेकर,सागर शिंदे यांच्या प्रयत्नातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. अद्यापही ज्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसेल तर त्यांनी करुन घ्यावी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रधानमंत्री आवास योजना(सर्वांसाठी घरे) संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.