प्रतिष्ठा न्यूज

आरग येथे पीएम किसान योजनेच्या कॅम्पमध्ये शेतकऱ्यांची गर्दी

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : आरग येथील पीएम किसान योजनेसाठी आज दिनांक 14 6 2023 रोजी ग्रामपंचायत आरग कार्यालयामधील पोस्ट ऑफिसमध्ये कॅम्प घेण्यात आलेला होता या कॅम्प साठी आरग लक्ष्मीवाडी शिंदेवाडी खटाव लिंगनूर या गावातील शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी पोस्टामध्ये गर्दी केलेली होती. या आमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त आधार कार्ड वरती पोस्टामध्ये स्मार्ट कार्ड काढून खाते काढून दिले जात आहे या अशा घेतलेल्या कॅम्पमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे या कार्यक्रमासाठी खालील प्रमाणे उपस्थिती होती.
सुभाष आबासो खोत, उपसरपंच आरग, सर्जेराव शंकर खटावे ग्रामपंचायत सदस्य आरग श्री शशिकांत सूर्यवंशी कृषी अधिकारी आरग श्री सागर मगदूम बी पी एम श्री श्रीकांत कांबळे बी पी एम निकिता कोळेकर जीडीएस श्री गिरीधर कुंभार जीडीएस श्री मोहित पारधी बी पी एम व पंचक्रोशीतील आरग लक्ष्मीवाडी शिंदेवाडी लिंगनूर खटाव या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.