प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज ही संपूर्ण मानवतेची अस्मिता आहे : प्रा गंगाधर बनबरे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : “शिवजन्मोत्सव 2023 ” निमित्ताने युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था , सांगली यांच्या वतीने ‘लढाया पलीकडले शिवाजी महाराज’ या विषयावर प्रा.गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान आयोजित करणेत आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व व त्यांचा इतिहास असीम आहे. त्याला कोणत्याही मर्यादेत बांधता येणार नाही.सदगुण, शक्ती, न्याय, संस्कार व सामर्थ्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
शौर्य, शील, करुणा, चारित्र्य व लोककल्याण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
छत्रपती शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नव्हे, तर चरित्र आहे. जाती पातीचे राजकारण न करता रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांचे कोण्या विशिष्ट धर्माबरोबर युद्ध नव्हते. सर्व जाती धर्माच्या, बारा बलुतेदार यांच्यातून मावळे आणि पराक्रमी सरदार निर्माण केले. त्यांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घेऊन त्यांचे गुण, शक्ती व विचार स्वतःमध्ये धारण करुन समाज निर्माण करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. महाराजांचा जन्म दिनांक, त्यांचे शिक्षण याविषयी वाद निर्माण करुन समाजाची दिशाभूल करणे. अश्या प्रकारची महाराजांची बदनामी करणाऱ्यांना समाजाने धडा शिकवला पाहिजे , आणि हिच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करणे होय असेही ते म्हणाले.
यावेळी “सांगलीच्या विकासाची शिल्पकार” या विशेषांकाचे प्रकाशन माजी आ शरद पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. संस्थेच्या वतीने विजय पाटील, सुशील हाडदरे, शाहीर देवानंद माळी, संपत कदम,आर एस चोपडे, सौ नंदा सावंत, डॉ दयानंद नलावडे, विश्वास गवळी यांना सांगली जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हिरकणी कट्टा या स्पर्धेत
हिरकणी म्हणून सुजाता शिंदे यांना बहुमान मिळाला. तर सीमा पाटील, सुजाता परीट, स्मिता देसाई, शैलजा कुरकुटे, रेश्मा कांबळे, प्रमिला सावळे, सुरेखा बाबळे,तांबोळी मॅडम यांनी बक्षीस पटकवले.
या स्पर्धेचे संयोजन संस्थेच्या सचिव रेखा पाटील व पूजा हेंबाडे साधना सिसाले यांनी केले.
यावेळी कार्यक्रमासाठी सचिन पवार राजेंद्रसिंह पाटील ,अमृत सूर्यवंशी, अजित सूर्यवंशी, ॲड.तेजस्विनी सूर्यवंशी, श्रीरंग पाटील ,डॉ संजय पाटील ,जालिंदर महाडिक, विनायक शेटे ,सचिन सकळे, विजय पाटील, आशा पाटील, प्रणिती पवार आणि अनेक शिवभक्त उपस्थितहोते.
कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष युवराज शिंदे, जितेंद्र भोसले, बाळासाहेब माने, फक्रुद्दीन भालदार,भारती पाटील, मकरंद पेडणेकर, मानसिंग शिंदे, श्रीकांत पाटील, जयंत निरगुडे, अमृता निरगुडे प्रीती विपट यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार पेडणेकर यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.