प्रतिष्ठा न्यूज

भारतीय जनता पक्षाने जाहीर केली विधानसभा निवडणूक प्रमुखांच्या नावाची घोषणा:लोहा-कंधार साठी युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर

प्रतिष्ठा न्यूज /वसंत सिरसाट
नांदेड : विधानसभा आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असून, भारतीय जनता पक्षाने सर्वच पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख जाहीर केले आहेत. त्यात लोहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच मतदार संघातील निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
राज्यात भारतीय जनता पक्षाने विधानसभा आणि लोकसभा निवडणूक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने संवाद कार्यक्रमांचे आयोजन करुन बुथ स्तरावर पक्ष संघटन मजबूत केले जात आहे. विशेष म्हणजे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणी केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुखांची घोषणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.