प्रतिष्ठा न्यूज

प्रभाकर बाबा पाटील हेच 2024 चे तासगांव कवठेमहांकाळचें आमदार : माजी मंत्री आ. सुभाषबापू देशमुख यांचे वक्तव्य

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगांव : तासगांव विधानसभा मतदार संघातून युवा नेते प्रभाकर (बाबा) पाटील हेच आगामी विधानसभा निवडणूकीत आमदार म्हणून विधानसभेत मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आशावाद माजी मंत्री आमदार सुभाषबापू देशमुख यांनी व्यक्त केला. ते मोदी @९ महाजनसंपर्क अभियान अंतर्गत तासगांव येथे खासदार संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.
यावेळी आमदार सुभाषबापू देशमुख म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जगात नावलौकिक वाढवत असून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित केंद्रातील सरकारला 9 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त मोदी @९ महाजनसंपर्क अभियान देशभर राबविण्यात येत आहे. आपल्या सांगली जिल्ह्यात लोकप्रिय खासदार संजयकाका पाटील हे विकासकामांच्या माध्यमातून लोकांच्या पुढे जात आहेत तोच वारसा त्यांचे चिरंजीव युवा नेते प्रभाकर पाटील चालवित असून त्यांना उज्वल राजकीय भविष्य आहे, त्यांच्या कतृत्वामुळेच भाजपाने त्यांची तासगांव कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी निवड करून पक्षाने त्यांचा सन्मान केला आहे. तासगांव कवठेमहांकाळ हे दोन्ही तालुके वर्षानुवर्षे दुष्काळाच्या दृष्ट चक्रात अडकलेले होते सन 2014 ला खासदार संजयकाका पाटील प्रथम खासदार झाल्यानंतर हजारो कोटी रूपयांचा केंद्र व राज्य सरकारच्यामार्फत निधी आणला त्यामुळे गेल्या 9 वर्षात अनेक भागातील गावांच्या बांधावर शेतीचे पाणी पोहोचले आहे,तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या माध्यमातून दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण झाली आहे.काका जिल्हयात फिरत असताना आपले होमग्राउंड असलेल्या तासगांव व कवठेमहांकाळ तालुक्याकडे काकांसह प्रभाकर पाटील अहोरात्र लक्ष ठेवून कामे करीत आहेत,त्यामुळे अल्पावधीतच प्रभाकर पाटील लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले आहेत,त्यांना आता विकासाच्या दूरदृष्टीमुळे तासगांव कवठेमहांकाळची जनता आताच आपला आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहत असल्याचा गौरव शेवटी आमदार देशमुख यांनी केला.
यावेळी प्रभाकर (बाबा) म्हणाले की, भाजपा केंद्र सरकारला ९ वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त मोदी @९ महा जनसंपर्क अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व सांगली जिल्ह्याचे लोकप्रीय खासदार संजय (काका) पाटील यांनी केलेली विकास कामे तळागाळातील नागरीक व मतदारापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही या अभियानातुन करणार आहे.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक भाजपाचे परसु बापु नागरगोजे, भाजपा तालुकाअध्यक्ष सुनिलभाऊ पाटील यांनी केले.यावेळी तासगाव शहराअध्यक्ष हणमंत पाटील,  माणिकाका जाधव,डॉ.पी.के.(भाऊ) पाटील, संभाजी (तात्या) पाटील सावर्डेकर, माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर, अविनाश पाटील, दिग्विजय भैय्या पाटील, शंकर वैद्य सर, अरुण साळुंखे, संदीप सावंत, मोहन पाटील, कृष्णा (आप्पा) पाटील, मारुती (भाऊ) एडके, विनायक खरमाटे उपस्थित होते. आभार अविनाश पाटील यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.