प्रतिष्ठा न्यूज

लोकांच्या प्रश्नापेक्षा गेस्ट हाउस वर बसून स्वतःच्या स्वार्थात गुंतलेल्या माणसांना मते मागण्याचा अधिकार नाही : संजयकाका पाटील यांची टिका; नांद्रे येथे बैठक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लोकांच्या प्रश्नापेक्षा गेस्ट हाऊसवर बसून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या लोकांना मतं मागण्याचा अधिकार नाही, अशी टीका विशाल पाटील यांचे नाव न घेता खासदार संजयकाका पाटील यांनी केली. ते नांद्रे येथे प्रचारादरम्यान आयोजित बैठकीत बोलत होते.
संजयकाका म्हणाले, लोकांच्या सुख दुःखात जायला लागतं. सामाजिक बांधिलकी जपायला लागते. परंतु यांना समाजाशी काही देणंघेणं नाही. यांना स्वतःचा स्वार्थ हवा आहे. स्वतःच हीत करण्यात गुंतलेल्या या माणसांना जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटायला हवी, मी म्हणालो होतो की तुम्ही 35 वर्षात केलेली कामे आणि मी दहा वर्षात केलेली कामे याचा हिशोब आपण एका स्टेजवर येऊन जनतेच्या न्यायालयात मांडूया. परंतु ते धाडस त्यांच्यामध्ये नाही. मी आणलेल्या निधीच्या दहा टक्के निधी सुद्धा ते आणू शकले नाहीत. साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊस वर बसून टवाळक्या करणे लोकांची माप काढणे. एवढाच त्यांचा उद्योग आहे. गेस्ट हाऊस ते मध्यवर्ती बँक आणि मध्यवर्ती बँक गेस्ट हाऊस एवढा त्यांचा प्रवास आहे. अस्मितेच्या गोष्टी करण्याचा यांना अधिकार नाही. यांच्या घरावर अन्याय झाला अन्याय झाला असे हे म्हणतात तर गेल्या अनेक वर्षात त्यांनी जनतेसाठी काय केलं हे सांगावं. 2014 ला किती लीड होतो आणि 2019 ला किती मताधिक्य होती याचा त्यांनी हिशोब करावा. जनतेसाठी ज्यांना काही करता येत नाही त्यांनी पोकळ नेतृत्वाचा उद्योग करू नये. आता लोकशाही झाले आहेत भारतीय जनता पार्टीने विकास केला आहे या पुढच्या काळात हा विकासाचा वेग अधिक गतिमान होणार आहे त्यामुळे या सांगलीची जनता ही भाजपालाच निवडून देणार आहे गेल्या दोन वेळेपेक्षा जास्त लिड या निवडणुकीत माझं असणार आहे. असा विश्वास संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पप्पू डोंगरे, भालचंद्र पाटील, भाजपा सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबेकर, राहुल सकाळे, रावसाहेब पाटील, माजी सरपंच महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोहसीन मुल्ला, अभिजीत सकळे, कलगौंडा पाटील, रावसाहेब ऐतवडे, शितल राजोबा यांच्यासह नांद्रे येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.