प्रतिष्ठा न्यूज

शक्ती केंद्र व महिलांची सांगलीत प्रचार मोहीम

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भाजपा महायुतीचे सांगली लोकसभा उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांचा प्रचार प्रभाग क्रमांक 12 व 14 गवळी गल्ली या भागातुन करण्यात आला. शक्ती केंद्र व महिलांनी विविध भागात प्रचार मोहीम राबवली.
माजी नगरसेविका सौ. उर्मिलाताई बेलवलकर, पश्चिम मंडल अध्यक्षा सौ.स्मिता भाटकर, कामगार मोर्चा प्रदेश सदस्य सौ.स्नेहजा जगताप, पश्चिम मंडल सरचिटणीस सौ.मोहीनी जामदार, सौ.मनीषा कुकडे, शक्तीकेंद्र प्रमुख मोहन जामदार, गजेंद्र खैर आणि भागातील महिलांनी प्रचार मोहीमेत सहभाग घेतला.
प्रभागातील घरोघरी जाऊन पत्रके वाटण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली विकास कामे, महिलांसाठी राबविण्यात आलेल्या योजना याची माहिती देण्यात आली. सांगली जिल्ह्यातील विकास कामे करण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांना तिसऱ्यांदा संधी द्यावी, असे आवाहन घरोघरी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.