प्रतिष्ठा न्यूज

विशाल पाटील म्हणजे भाजपची बी टीम : चंद्रहार पाटील ; मिरज पुर्व भागात संवाद यात्रा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, ता. २४ : विशाल पाटील यांनी बंडखोरी केली म्हणजे ते भाजपची बी टीम आहे. भाजपकडून पाकीट घेऊन पाकीट या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मी त्यांना फार महत्व देत नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केली आहे. त्यांनी आज मिरज पुर्व भागात संवाद यात्रा काढली. यावेळी सलगरे येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
चंद्रहार पाटील म्हणाले,‘‘संजय पाटील, विशाल पाटील या दोघांनाही विरोधक मानत नाही. त्यांनी कोणता विकास केलाय जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनता माझ्याच पाठिशी आहे. विशाल पाटील त्यांच्याच धुंदीमध्ये आहेत. एककाळी सांगलीतून काँग्रेसचे तिकीट वाटप केली जायची. तोच काँग्रेस पक्ष आज तुम्हाला उमेदवारी देत नाही. तुम्हाला 2019 आणि 2024 या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी का नाकारली याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आपलं सांगली जिल्ह्यातलं कर्तृत्व शून्य आहे म्हणून आपल्याला काँग्रेस पक्ष नेतृत्वाने उमेदवारी दिली नाही हे सुद्धा तितकच खरं आहे म्हणूनच अपक्ष राहण्याची वेळ आली आहे. विशाल पाटलांनी स्वतःला खरा पैलवान म्हणणे म्हणजे आम्हा पैलवानांना चेष्टा वाटायला लागली आहे. विशाल पाटील जर पैलवान झाले तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांनी तालमी सोडून घरी जायला पाहिजे.’’खरी कुस्ती ही भाजपचे संजय काका पाटील आणि माझ्यातच आहे उगाच सहानभूतीच्या नावाखाली सांगली जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करू नये भारतीय जनता पार्टीला सांगली जिल्ह्यातील लोक कंटाळलेली आहेत तेच ते वादे तीच ती आश्वासन आणि तोच तो खासदाराचा चेहरा बघून लोक कंटाळलेले आहेत त्यामुळे या वेळेला सांगली जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि परिवर्तनाच्या लाटेमध्ये उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये केलेलं काम हे मला विजय मिळवून दिल यात शंका नाही
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले,‘‘दहा वर्षे खासदारांची कामगिरी निराशाजनक आहे. खासदारांनी मालमत्ता, कारखाना विकत घेऊन स्वत:ची संपत्ती दुप्पट, चौपट केली. सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. सांगली जिल्ह्यातील किती तरुणांच्या हाताला खासदार आणि काम दिलं याबाबत जाहीर खुलासा करावा ,विशाल पाटील हेही बंडखोर उमेदवार आहेत. त्यांनी मागली पाच वर्षात काही केले नाही. आता काँग्रेसचा पुळका त्यांना आला आहे.’’ मिरज पुर्व भागातील सुभाषनगर, कळंबी, मालगाव, गुंडेवाडी, खंडेराजुरी, एरंडोली, सलगरे, खटाव, बेडग प्रचारादरम्यान पदयात्रा व बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते मनोज बाबा शिंदे, बापूसो बोरसे माझी जि प सदस्य आप्पासाहेब हुल्ले,प्रमोद इनामदार, विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते , उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, तालुकाप्रमुख संजय काटे, विशाल सिंग रजपूत ,सिद्धार्थ जाधव, चंद्रकांत मैंगुरे महिला आघाडी जिल्हा संघटिका मनीषा ताई पाटील, सरोजिनी माळी, साकीरा जमादार, सुगंधा माने, सोनाली भोसले, निता आवटी तसेच गावातील ज्येष्ठ नागरीक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.