प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समितीची पहिलीच मासिक सभा रद्द : विरोधकांच्या दणक्याने राष्ट्रवादीचा भोंगळ कारभार उघड

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव बाजार समितीची होणारी पहिलीच मासिक सभा रद्द करण्यात आली आहे.सभापती निवडीनंतर आयोजित करण्यात आलेली पहिली मासिक मीटिंग रद्द करायला भाग पाडून नवनिर्वाचित विरोधी संचालकांनी सत्ताधारी राष्ट्रवादीला मोठा झटका दिला आहे.कोणत्याही नियमाचे पालन न करता बेकायदेशीरपणे कारभार करून बाजार समितीची लूट करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला वठणीवर आणू असा इशारा बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी दिला आहे.महादेव नाना पाटील, कुमार काका शेटे,रेखा पाटील व सुरेश बेले यांनी दिलेल्या अर्जानुसार मासिक मीटिंग रद्द करत तातडीची मीटिंग आयोजित करण्यात आली आहे.याबाबत महादेव नाना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कीं 25 मे रोजी सभापती निवड करण्यात आली त्यानंतर 30 मे ला विशेष मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेत सहा विषय लावण्यात आले होते,मात्र बाजार समितीच्या नियमानुसार संचालकांना दहा दिवसाची नोटीस दिल्याशिवाय सभेचे आयोजन करता येत नाही.याच मुद्द्यावर बोट ठेवून सदरच्या सभेबाबत विरोधी संचालक महादेव पाटील,रेखा पाटील,कुमार शेटे व सुरेश बेले यांनी तक्रारी अर्ज दाखल केला व बेकायदेशीर सभा घेण्याचा प्रयत्न केला तर डी डी आर कडे तक्रार करून सभा रद्द करण्याचा इशारा दिला त्यामुळे सदरची मासिक सभा रद्द करून नियमानुसार तातडीची सभा आयोजित करण्यात आली.त्याबाबतीत बोलताना महादेव पाटील म्हणाले बाजार समितीची सभा आयोजित करण्याबाबत नियमामध्ये स्पष्ट तरतूद आहे याबाबतीत डी डी आर यांच्याकडून विचारणा होऊ शकते मात्र तरीही हम करे सो कायदा या वृत्ती प्रमाणे केवळ पाच दिवसाच्या अंतराने मीटिंग आयोजित करण्यात आली.यावरून राष्ट्रवादी काँग्रेस बाजार समिती कशाप्रकारे नियमबाह्य कारभार करते याचे एक उदाहरण पाहायला मिळाले.अशाच प्रकारच्या भोंगळ कारभार करीत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार गेल्या अनेक वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समितीत केला आहे.या पुढील काळात जर राष्ट्रवादीने आपल्या कारभारात सुधारणा केली नाही तर गाठ आमच्यशी आहे असा सज्जड इशारा महादेव पाटील यांनी दिला आहे.

पहिली सभा रद्द : राष्ट्रवादी काँग्रेसची एकतर्फी बाजार समितीत सत्ता आहे त्यामुळे विरोधाची भीती नव्हती.मात्र या निवडणुकीत महादेव पाटील यांची निवड झाल्यापासून या एकतर्फी कारभाराला ब्रेक लागण्याची चर्चा सुरू होती.पहिलीच सभा आपल्या अभ्यासू प्रवृत्तीने रद्द करायला लावून या पुढचा कारभार राष्ट्रवादीसाठी सोपा नसल्याचे सिद्ध केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.