प्रतिष्ठा न्यूज

जत तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश : पाणीदार संजयकाकांना पुन्हा खासदार करण्याचा निर्धार

प्रतिष्ठा न्यूज
डफळापूर प्रतिनिधी : जत तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज बिळूर येथे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत तालुक्याचा दुष्काळ दूर करणारे पाणीदार खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा खासदार करण्याचा निर्धार करून आपण पक्षप्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
सांगली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज जत तालुक्यात विविध गावांचा दौरा करण्यात आला.
या दौऱ्या वेळी बिळूर येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यामध्ये भैराप्पा सिद्धनाथ, संजय चव्हाण, विनोद धोडमनी, पिंटू हक्की, गुरबसु चौधरी, भैराप्पा कोंची, श्रीकांत माळी, हणमंत रुपण्णावर, शिवानंद माळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी कार्यकर्ते म्हणाले, विस्तारित म्हैसाळ योजना यशस्वीपणे राबविल्याने जत तालुक्यात पाणी आले आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी जीवाचे रान करून पाणी आणले. म्हणून जनतेने पाणीदार खासदार असा त्यांचा गौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि येत्या काळात जत तालुका संपूर्णपणे दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ देऊन पाणीदार खासदार संजयकाकांना पुन्हा खासदार करण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
यावेळी बिळूर व डफळापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.