*समतावादी महासंघाचा विशाल पाटील यांना पाठिंबा*
प्रतिष्ठा न्यूज
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना संपावादी महासंघाचे सोमवारी पाठिंबा जाहीर केला. महासंघाच्या वतीने पाठिंबाचे पत्र पी. एल. राजपूत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे राज्य कार्याध्यक्ष गणेश माने प्रदेशाध्यक्ष अतुल चव्हाण संघटक अस्लम मुजावर जिल्हाध्यक्ष अण्णा वाघमारे उपाध्यक्ष रामभाऊ लांडगे विटा शहराध्यक्ष रमेश कांबळे सिद्धार्थ माने सार्थक माने उपस्थित होते.