प्रतिष्ठा न्यूज
राजकीय

संजयकाकांच्या प्रचारासाठी महंत योगी आदित्यनाथ यांची बुधवारी महाविजय संकल्प सभा; सांगलीत उसळणार लाखोंचा जनसागर; जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ यांची महाविजय संकल्प सभा बुधवार दि. १ मे रोजी दुपारी ३.०० वाजता सांगली येथील चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून जिल्ह्यासह परिसरातील लाखोंचा जनसागर उसळणार आहे. अशी माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली.
प्रकाश ढंग म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार संजय पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून जिल्हाभरात अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांची महा विजय संकल्प सभा सांगलीत होत असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
आज सुरक्षा यंत्रणांनी सभास्थळाची पाहणी केली. पोलिस प्रशासनाने सभेसाठी कडे कोट सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे.
सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमंकाळ, तासगाव, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव, मिरज या सर्व भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करणार आहेत. त्याचबरोबर आसपासच्या जिल्ह्यातील कार्यकर्तेही या सभेला येणार आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या महा विजयाचा संकल्प करण्यासाठी प्रचंड जनसागर लोटणार असून सभेची सर्व तयारी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ठरले नक्की हॅट्रिक पक्की अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत होत्या आता यावरती योग्य आदित्यनाथ शिक्कामोर्तब करणार आहेत. कार्यकर्त्यांनी सभेला वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन प्रकाश ढंग यांनी केले. सांगली जिल्ह्यातील भाजपा व महायुतीचे सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, मंत्री उपस्थित राहणार आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.