प्रतिष्ठा न्यूज

वाचाळवीर कृषिमंत्री अब्दुल सत्तार याची मंत्रिमंडळातुन हाकालपट्टी करा : हरिहरराव भोसीकर

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि. 8 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून  हाकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष *हरिहरराव भोसीकर* यांनी केली.
काल अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना खा. सुप्रियाताई सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष *हरिहरराव भोसीकर* यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून सत्तार यांच्यावर पोलीस कार्यवाही करून सत्तार यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आली. यानंतर शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन सत्तार यांच्यावर पोलीस कार्यावही करावी याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी माजी सभापती भगवानराव आलेगावकर, डी. बी. जांभरूणकर,वसंत सुगावे पाटील, सुभाषराव गायकवाड, गजानन पापंटवार,प्रांजली रावणगावकर,धनंजय सूर्यवंशी, रमेश गांजापूरकर, अजिंक्य देशमुख, डॉ. मुजाहिद खान,गफारखान,बालाजीराव शेळके, डॉ. विक्रम देशमुख,विश्वनाथ बडूरे, डॉ. उत्तमराव सोनकांबळे, प्रकाश मांजरमकर,अभिजीत मुळे, जि. प.सदस्य विजय धोंडगे, रेखा राहिरे,प्रेमकुमार कौसल्ये,श्रीकांत मांजरमकर,माधवराव पवार,बाबूराव हंबर्डे, सुभाष भोसले, नारायण शिंदे,बालासाहेब मादसवाड,उत्तमराव आलेगावकर,यशोदा शेळके, पूजाताई व्यवहारे, अनमोलसिंग कामाठेकर,मकसूद पटेल, बालाजी बोकारे, शिवाजीराव जाधव,एम. डी. बनसोडे, रामदास पा. जाधव,बालाजीराव माटोरे, भगवान बंडे, कुसुम देशमुख, गंगासागर खंदारे, दिपमाला कंधारे, ज्योती पेटकर,बालाजी बोकारे,सुभाषराव रावणगावकर यांच्यसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक  कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.