प्रतिष्ठा न्यूज

तासगाव सांगली रोडवरील बेदाणा वॉशिंगचे केमिकल युक्त पाणी आरफळच्या कॅनॉल मध्ये

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगांव सांगली रोडवरील सिद्धिविनायक कोल्ड स्टोरेज नजिक इगल फायर वर्क्स जवळील बेदाणा वॉशिंग सेंटर वाल्यानी बेदाणा वॉशिंगचे दुर्गंधी युक्त केमिकलचे पाणी चक्क आरफळच्या कॅनॉल मध्ये उघड्यावर सोडले आहे.सदर बेदाणा वॉशिंग मध्ये बेदाणा वॉशिंग करताना त्यामध्ये केमिकल,कार्बोनेट सोडा, डिपींग ऑईल,निरमा हे वॉशिंग करण्यासाठी वापरले जाते.त्यानंतर बाहेर पडणारे घाण पाणी हे आरोग्यास अपायकारक असते,त्यामुळे या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हि वॉशिंग मालकाची असताना,सुद्धा याठिकाणी हे केमिकल मिश्रित पाणी राजरोसपणे कॅनॉल मध्ये सोडण्यात आले आहे.सध्या या रस्त्यावरून कवठे एकंद,वासुंबे,मतकूनकीला जाणाऱ्या लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे.हे सर्व नियमबाहय असतानाही संबंधित वॉशिंग सेंटर हे राझरोसपने नियमित सुरु आहे.तरी याची जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.