प्रतिष्ठा न्यूज

किसान विद्यालयात माँ जिजाऊसाहेब जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी :- लोहा तालुक्यातील उमरा येथील किसान विद्यालयात स्वराज जननी राष्ट्रमाता-राजमाता माँ जिजाऊसाहेब यांची 425 वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.तसेच स्वामी विवेकानंद यांची 160 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. टी. सिरसाट हे होते, तर प्रमुख म्हणून शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. मुगल हे होते. यावेळी शाळेतील मुलींनी माँ जिजाऊसाहेब यांच्या वेशभूषेत कपडे परिधान करूनमाँ जिजाऊसाहेब यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारे विचार मांडले.तर मुलांनी स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा करून त्यांचे चांगले विचार आपल्या भाषणातुन मांडले.
या वेळी शाळेतील पद्दमवार, व्ही.आर. शिंदे, कदम, जाधव, तातेराव पाटील, पी.व्ही.सिरसाट, ए.डी. शिंदे, माधव बच्चेवार, युनूस मोमीन, शादुल शेख, सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख रामचंद्र शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन  रायकवाड सर यांनी मांडले. व शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.