प्रतिष्ठा न्यूज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले नारीशक्ती दूत अँपला एडिटिंग ऑप्शन देण्याची मुख्यमंत्र्यांच्या सर्वच लाडक्या बहिणींची मागणी

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज दि. 9 : राज्य सरकारने राज्यातील 21 ते 65 वर्षाच्या आतील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून या योजने अंतर्गत महिलांना काही निकष व अटींवर महिना 1500 रुपये देण्यात येणार असून त्यासाठी लागणारे ऑनलाईन व ऑफलाईन कागदपत्रे भरण्यासाठी महिला भगिनींची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे या योजनेचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट ही जरी असली तरी सदरचे फॉर्म भरताना महिलांना खूपच अडचणी येत आहेत त्यात प्रामुख्याने येत असलेली अडचण म्हणजे शासनाने या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल वरती नारीशक्ती दूत या नावाने अँप सुरू केले आहे या अँपच्या माध्यमातून या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरले जात आहेत.
ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या कामाची जबाबदारी शासनाने अंगणवाडी सेविका यांच्यावर सोपवली असून हे ऑनलाईन अँप वापरत असताना खूप अडचणी येत आहेत काही वेळा नजरचुकीने तर काही वेळा घाई गडबडीत ऑनलाईन माहिती भरत असताना त्यामध्ये त्रुटी रहात आहेत ऑनलाईन अर्ज भरताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणात त्रुटी असलेले अर्ज सबमिट झाले आहेत आणि जे अर्ज सबमिट केले गेले आहेत ते दुरुस्ती करता येत नाहीत त्यामुळे सदरच्या नारीशक्ती दूत या अँपमध्ये ऑनलाईन फॉर्म दुरुस्तीसाठी एडिट ऑप्शन सुरू करावे अशी मागणी सर्वच महिला वर्गातून केली जात आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.