प्रतिष्ठा न्यूज

पोक्सो ॲक्ट विषयी जनजागृती होणे काळाची गरज न्यायाधीश डॉ. आर.एस.कुळकर्णी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या निर्देशानु सार तालुका विधी सेवा समिती तासगाव यांचे मार्फत आज संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्राथमिक आश्रमशाळा, तासगाव येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करणेत आले होते.यावेळी न्या.डॉ.आर.एस.कुळकर्णी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तासगांव,श्रीमती के.ए.फोंडके  सरकारी विधीज्ञ,प्रमुख वक्ते मा. इम्तीयाज हकीम व शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश नरुले सर उपस्थित होते.कायदेविषयक जागृती करण्याच्या हेतूने आयाेजित या कार्यक्रमा मध्ये इम्तीयाज हकीम(सुपरवायझर जिल्हा चाईल्ड लाईन हेल्पलाईन) यांनी मुलांना गुड टच बॅड टच कसे ओळखावे,चाईल्ड लाईन हेल्पलाईन कशी काम करते, त्यासोबतच इतर शासकीय मदत यंत्रणा आणि त्यांचा लाभ कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश डाॅ.आर.एस.कुळकर्णी सााे यांनी पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हयाचे स्वरुप, अंमलबजावणी,शिक्षा याविषयीच्या तरतुदी सांगितल्या व विद्याथ्यानी  बाल लैंगिक शोषणाला बळी पडू नये, जर कोणाच्याही बाबतीत असुरक्षितता वाटत असेल तर बोलावे,  शिक्षकांनी सुध्दा या गोष्टींचे वाढते प्रमाण पहता जागरुक होऊन अशा गोष्टीवर लक्ष द्यावे असे आवाहन केले.
कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री महेश नरूले यांनी केले.प्रास्ताविक करताना सहा शिक्षक संजय शेडबाळे यांनी प्रशासनात महिलांचे योगदान याविषयी माहिती दिली.आभार सहा.शिक्षक सौ.पाटील  यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजन  रमजान शेख,संजय.एम.गवळी, योगेश शिंदे,मिला शेख,प्रियांका माने यांनी केले.कार्यक्रमासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.