प्रतिष्ठा न्यूज

शिक्षणामुळे बहुजन समाज स्वाभिमानी व स्वावलंबी होतो : पृथ्वीराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी दि. ११ : वंचित बहुजन समाजातील मुलं शिकली पाहिजेत,त्यांच्या शिक्षणात खंड पडता कामा नये, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, पालकांनी लेकरांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांना प्रगतीचा मार्ग खुला केला पाहिजे. शिक्षणामुळे बहुजन समाज स्वाभिमानी व स्वावलंबी होतो, ही पृथ्वीराज पाटील फौंडेशनची प्रामाणिक भावना आहे.त्यासाठी फौंडेशनच्या वतीने महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके, स्कूल बॅगा, वह्या वाटप उपक्रम राबवला जातो. कष्टकरी बहुल वस्ती असलेल्या संजयनगर व लव्हली सर्कल परिसरातील शाळा नं ३९ व ४५ मध्ये फौंडेशनच्या वतीने वह्या वाटपाचा उपक्रम संपन्न होत आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या उमेदीने अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करावे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने शाळा नं ३-संजयनगर पोलिस स्टेशन परिसर व ४५-लव्हली सर्कल परिसरातील शाळांमधे वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते आज शाळेत वह्यांचे वाटप करण्यात आले.


गेल्या वर्षी उर्दू शाळा नं. ४५ मध्ये फौंडेशन मार्फत स्कूल बॅग वाटप कार्यक्रम झाला त्यावेळी मुख्याध्यापिकांनी शाळेला झोपाळा व घसरगुंडी बसवून देण्याची मागणी केली होती.त्यावेळी सदर मागणीची पूर्तता करण्याचा शब्द पृथ्वीराज यांनी दिला होता त्याप्रमाणे झोपाळा व घसरगुंडीचे लोकार्पण करुन पृथ्वीराज पाटील फौंडेशनने दिलेला शब्द पाळला.त्यामुळे शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले.


यावेळी नगरसेवक संतोष पाटील, शुभांगी साळुंखे, अल्ताफ पेंढारी, तोहीद फकीर, इरफान मुल्ला, हसनअली मुल्ला, जमील मुल्ला, धनंजय खांडेकर, प्रताप चव्हाण, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या या शैक्षणिक उपक्रमाबद्दल परिसरातील लोकांनी समाधान व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.