प्रतिष्ठा न्यूज

तासगाव मुख्याधिकाऱ्यांकडून शहरातील सर्व दुकानांसाठी परिपत्रक जारी… न्यायालय आदेशाचे पालन करा अन्यथा कारवाई

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहरातील अनेक दुकानाच्या पाट्या ह्या इंग्रजी भाषेत असल्याचे आढळून आल्याने मनसे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी याबाबत नगर पालिका प्रशासनास निवेदन देऊन योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली होती,त्यानुसार आता शहरातील दुकानें,आस्थापना,यांच्या पाट्या मराठीत लावण्याच्या सूचना पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील यांनी दिल्या आहेत.मराठीत पाट्या लावणे बंधनकारक असल्याचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की,तासगाव पालिकेच्या हद्दीत कार्यरत असलेल्या विविध व्यवसाय प्रकारातील आस्थापनांनी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१८ नुसार महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाचा नामफलक प्रथमदर्शनी मोठ्या अक्षरांत मराठी भाषेत अग्रभागी ठळक लिहिणे बंधनकारक असून मुंबई दुकाने आणि आस्थापना अधिनियम, १९४८ नुसार अंतर्भूत होणाऱ्या सर्व संस्था,दुकाने, वाणिज्यिक आस्थापना,निवासी हॉटेल्स,आहारगृहे,खाद्यगृहे, सार्वजनिक मनोरंजनाची व इतर ठिकाणे यांना लागू होत असून शहरातील व्यावसायिकांनी दुकानाचा नामफलक मराठी भाषेत असावा, आस्थापनेचा नामफलक हा मराठी सोबतच अन्य भाषांमध्ये असू शकतो; परंतु मराठी भाषेतील नामफलकांवरील अक्षरांचा आकार अन्य भाषामधील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.
आस्थापनेचा नावाचा फलक हा मराठी देवनागरी लिपीत लावावा.सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे २४ नोव्हेंबर २०२३ पर्यंतआवश्यक होते, परतु अजूनही काही आस्थापनांनी याबाबत कार्यवाही केलेली नाही,असे निदर्शनास आलेले आहे.या निवेदना द्वारे तासगाव नगरपरिषद हद्दीतील सर्व आस्थापनांना सूचित करण्यात येते की,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे,ज्या आस्थापना वरील आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर शासकीय नियमानुसार उचित ती कारवाई करण्यात येईल,असेही निवेदनात म्हटले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.