प्रतिष्ठा न्यूज

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शिक्षक सेनेच्या वतीने लोहा शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड/ लोहा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक सेनेच्या वतीने लोहा शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यात लोहा शहरातील जि.नांदेड जि.प.हायस्कूल व जि.प.अनाथ मुलांच्या वसतिगृहात शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या ,पेनी,गुडडे बिस्कीट वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठूभाऊ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील भांगे, तालुकाध्यक्ष संभाजी पवार, तालुका सल्लागार नागेश स्वामी,मु.अ. हेमंत कंवर, मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास सावळे, पत्रकार विनोद महाबळे, सहशिक्षक नंदकिशोर गुंडरे, फारुख शेख, भगवान चव्हाण, राजीव तिडके,सौ.छाया बैस,संजय जाधव, नामदेव जाधव आदी उपस्थित होते.
तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोहा तालुक्यातील मौजे.भाद्रा ,व सोनमांजरी तांडा येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी जि.प,प्रा,शाळा जवळा दे. येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त लेखन साहीत्य वाटप केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर ढवळे सर, संतोष घटकार सर ऊपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.